Letest News
रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल येथे कै पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांची 125 जयंती व शे... शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांची बदली त्याच्या जागी अमोल भारती यांची वर्णी साईसेवेच्या कार्यात उल्लेखनीय योगदान करणाऱ्या साईभक्त रघु सुंदरम यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीन... शिर्डी दुहेरी हत्याकांडातील आरोपींविरुध्द मकोका कायदयान्वये कारवाई नगर मनमाड रोडवरील हॉटेल मध्ये खंडणीसाठी गुंड्यांचा हैदोस  शिर्डीचे ग्राम महसूल अधिकारी सतीश गायके यांची गच्ची धरून धक्काबुकी करीत चोरीचा मुरुमाचा डंफ़र तस्करा... तत्कालीन अकार्यक्षम पोलीस निरीक्षक दिनेश आहेरचा कारनामा सहा जिवंत काडतूस जमा करून एक काडतूस केला गाय... स्थानिक निवडणुकी साठी शिवसैनिकाणी सज्ज रहा अपहरणं करून डोक्याला बंदूक लावत पन्नास लाखाच्या चेकवर सही करून घेतली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश हिरे सुवर्णविजेते पदकचे माणकारी
शिर्डीसंपादकीय

ख्रिसमस ट्री सजावट! चॉकलेट वाटणारा सांताक्लॉज! चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई!

राहाता (प्रतिनिधी)ख्रिस्ती बांधवांसाठी नाताळ हा सण महत्त्वाचा असून दरवर्षी २५ डिसेंबरला हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजनही केले जात आहे. सोमवार २५ डिसेंबर 2023 रोजी ख्रिसमस नाताळ हा सण असून तो अहमदनगर जिल्ह्यासह राहता येथेही मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. जगभरात प्रभू येशूचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने जिल्ह्यामध्ये विविध चर्च ,प्रार्थना मंदिरे यावर विविधप्रकारे सजावट करण्यात आलेली आहे. ठिकठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे.
नाताळ हा शब्द नातूस म्हणजे जन्म या लॅटिन शब्दापासून बनला आहे. या दिवसाला इंग्रजी भाषेत क्रिसमस म्हणतात. ख्रिसमस म्हणजे ख्रिस्तमहायज्ञ (मिस्सा). ख्रिस्त महागुरुंना ख्रिस्तमसच्या दिवशी तीन मिस्सा अर्पण करण्याची परवानगी दिली गेली. ख्रिस्ताच्या जन्मघटकेचे स्मरणार्थ पहिला मिस्सा मध्यरात्री अर्पण केला जाते. ख्रिस्ताचा जन्म मध्यरात्री झाला अशी मान्यता आहे.
दुसरा मिस्सा पहाटे व तिसरा मिस्सा दिवसात अर्पण केला जात असे. मध्यरात्रीचा मिस्सा बेथलहेम येथे अर्पण केला जाते. हे इस्राईल देशातील एक छोटंसं गावं आहे. ह्याच गावात ख्रिस्तांचा (प्रभू येशू) जन्म झाला. ह्या दिवशी इथून लोकं रात्रीच्या समयी मिरवणूक काढून जेरूसेलम गांवी पहाटेच्या सुमारास पोहोचतात. तिथे दुसरा मिस्सा अर्पण केला जातो. नंतर दिवसाढवळी महामंदीरात सर्व ख्रिस्ती बांधव एकत्र होतात त्यावेळी तिसरा मिस्सा अर्पण होत असे.
नाताळ सणामध्ये भेटवस्तू देण्याची प्रथा अत्यंत महत्त्वाची आहे. विशेषतः लहान मुले ह्या सणाची खूप आतुरतेने वाट बघतात. सांताक्लॉज येऊन मुलांना भेट वस्तू आणि खाऊ देतात अशी मुलांना समज असते. महाराष्ट्रातील ख्रिस्ती लोक दिवाळीप्रमाणे या दिवशी करंज्या व अन्य खाद्यपदार्थांचे एकमेकांस आदान-प्रदान करतात. लहान मुलांना सांताक्लॉजच्या वेषात येऊन भेटवस्तू देतात.
या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू, शुभेच्छा पत्रे देऊन परस्पर अभिनंदन करतात. आपल्या घरात रोषणाई करतात. घराला सजवतात. ‘ख्रिसमस वृक्ष सजावट’ करतात. (ख्रिसमस ट्री – नाताळसाठी सजवलेले सूचिपर्णी झाड) असते. हे झाड ह्या सणाचा एक अविभाज्य घटक आहे. ख्रिसमस ट्री हे स्वर्गातल्या ईडन बागेतील झाड व क्रूसाचे झाड यांचे प्रतीक आहे.
या सणावर चॉकलेट केक बनवले जाते. कॅथोलिक ख्रिस्तसभेमध्ये ख्रिस्तजन्माची स्मृती म्हणून गोशाळा किंव्हा गायीचा गोठा तयार करण्याची परंपरा आहे. हा सण लहान थोर सर्वे अति उत्साहाने आनंदाने साजरा करतात. हा सण सर्वाना एकत्र आणण्याचा सण आहे. असा हा ख्रिसमस नाताळ सण मोठ्या उत्साहात जिल्ह्यात राहता तालुक्यातही साजरा होत आहे. सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळ सणा निमित्त ख्रिसमस सणाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button