Letest News
मंदिर परिसरात कोयता फिरवत दहशत-शिर्डी पोलिसांची धडक कारवाई-तरुण गजाआड राहता येथे बुलडोझर- मग वाळकीतील आरोपीबाबत काय? नागरिकांचा सवाल अब्दुल बाबा दरगाह साई संस्थानच्या ताब्यात घ्या हिंदू जनआक्रोश मोर्चात सागर बेग यांचा एल्गार गणेश गॅस एजन्सीचे संस्थापक बबनराव भुसारी पाटील यांची ज्ञानेश्वर कारखान्याच्या संचालकपदी निवड शिर्डीत भाविकांच्या जीवाशी खेळ-निकृष्ट पेढ्यांचा गोरखधंदा सुरूच-एफडीएचे मात्र 'हातावर हात'! साईनगरीत साखळीचोरांचा हैदोस-दर्शनासाठी आलेल्या वृद्ध भाविकेची ३ लाखांची लूट-चोराला नागरिकांनीच शिकवल... उत्तम आरोग्यासाठी योग ही भारताची विश्वाला देणगी - जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील लग्नाच्या आमिषाने तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश-राहाता पोलिसांची धडाकेबाज कारवाई शिवसेना वर्धापन दिन उत्साहात-शिर्डीत शिवसैनिकांचा जल्लोष साई समाधीवर फुलांची चादर अर्पण करत शिवसेनेच... साईनगरीत चोरट्यांचा धुमाकूळ!-साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक ७ समोरच साईभक्त महिलेचे 2 लाखांचे सोन्या...
क्राईमशिर्डी

तोंडावाटे धूर ओढत-नाकावाटे सोडत गांजा सेवन-शिर्डीत चार तरुण गजाआड!

🚨 शिर्डीत दोन ठिकाणी गांजाचे सेवन; चार तरुण गजाआड
शिर्डी शहरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला असून दोन वेगवेगळ्या ठिकाणी गांजाचे सेवन करताना चार तरुणांना रंगेहाथ पकडण्यात आले. तोंडावाटे धूर ओढून नाकावाटे सोडत चिलीमद्वारे गांजा सेवन करत असताना ही कारवाई करण्यात आली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


🔎 हॉटेल अभिषेक मागील काटवनात पहिली कारवाई
शिर्डी पोलीस स्टेशनच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी सुमारे ७ वाजता हॉटेल अभिषेक मागील काटवन परिसरात दोन तरुण गांजा सेवन करत असल्याची खबर मिळाली. पोलिस उपनिरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पंचांसमक्ष छापा टाकला.
यावेळी
विशाल आण्णा अभंग (वय १९, रा. करडोबानगर, शिर्डी)
यश बाळकृष्ण मोरे (वय १९, रा. निमगाव, ता. राहाता)
हे दोघे चिलीममधून गांजा ओढताना आढळून आले. त्यांच्या ताब्यातून चिलीम व माचीस जप्त करून पंचांसमक्ष नष्ट करण्यात आले. ग्रामीण रुग्णालय राहाता येथे वैद्यकीय तपासणीत गांजा सेवन केल्याचे निष्पन्न झाले.


🌙 रात्री उशिरा दुसरी कारवाई; आणखी दोघे जेरबंद
याच दिवशी रात्री सुमारे ९.३० वाजता त्याच परिसरात दुसरी कारवाई करण्यात आली.
यावेळी
रामा अमोल माळी (वय १९, रा. गणेशवाडी, शिर्डी)
अनिल मच्छिंद्र माळी (वय २०, रा. निमगाव, ता. राहाता)
हे दोघे चिलीमद्वारे गांजाचा धूर तोंडातून ओढून नाकातून सोडताना आढळले. पंचनामा करून साहित्य जप्त करण्यात आले असून वैद्यकीय अहवालात गांजा सेवन केल्याची पुष्टी झाली आहे.


⚖️ एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल
चारही तरुणांविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. शिर्डी पोलिसांनी शहरात गांजा व इतर अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button