शिर्डी :
भारतीय क्रिकेट संघातील प्रसिद्ध खेळाडू तसेच टी-20 संघाचे कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी आपल्या संपूर्ण परिवारासह आज शिर्डीत येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. या प्रसंगी त्यांनी मध्यान्ह आरतीस उपस्थित राहून श्री साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत साईबाबांचे आशीर्वाद घेतले.

दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी सूर्यकुमार यादव यांचा सत्कार करून त्यांना श्री साईबाबांचे फोटो व साहित्य प्रदान केले.
या वेळी प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, मंदिर विभागप्रमुख विष्णु थोरात, जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे आदी अधिकारी उपस्थित होते.
शिर्डीत
सूर्यकुमार यादव यांनी समाधी मंदिरात काही काळ शांतपणे ध्यानस्थ होऊन साईबाबांचे दर्शन घेतले. त्यांनी मंदिर प्रशासनाचे उत्कृष्ट व्यवस्था आणि सेवाभावाबद्दल विशेष कौतुक केले.