Letest News
कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी शिर्डीत दिव्यांग स्वाभिमानाचा ऐतिहासिक विजय! आ. बच्चू कडूंचे दिव्यांगांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी मो... गुरुपौर्णिमा उत्सवात साईभक्तांची श्रद्धेची उधळण!श्री साईबाबा संस्थानला अवघ्या तीन दिवसांत ७.८१ कोटीं... शिर्डीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम: साई आश्रया अनाथालयातील मुलांना शैक्षणिक सा... गुरुपौर्णिमेत 'गावकरी गेट'वर संशयास्पद प्रवेशाचा खेळ? साईभक्त रांगेत… मग काहींना थेट प्रवेश कसा? धाडीनंतरही कायम अनुत्तरित प्रश्न साकुरी क्लबप्रकरणी 'मास्टरमाइंड' कोणाला वाचवले जात आहे? बोगस खात्यांच्या घोटाळ्यात मोठी कारवाई- आरोपी अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात!
राजकीयशिर्डी

ब्रेकिंग : “निवडून येणारच कोण? जयश्री काकूंशिवाय आहेच कोण!” — शिर्डीत सर्वत्र एकच चर्चा

शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आता चित्र जवळपास स्पष्ट होत चालले असून, शिर्डी शहरात सध्या एकच चर्चा जोर धरू लागली आहे — “निवडून निवडून येणारच कोण, जयश्री काकूंशिवाय आहेच कोण!”
मतमोजणीच्या ताज्या फेऱ्यांनुसार जयश्री थोरात या तब्बल 5000 मतांच्या आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा शहरभर रंगू लागली आहे.
धारधार : 5000 मतांची आघाडी; विरोधक गारद होण्याच्या मार्गावर
नगराध्यक्षपदाच्या लढतीत जयश्री थोरात यांनी सुरुवातीपासूनच भक्कम आघाडी घेतल्याचे चित्र समोर येत आहे. फेरीमागून फेरी त्यांची आघाडी वाढत चालली असून, 5000 मतांची निर्णायक आघाडी ही केवळ आकड्यांची नाही, तर जनतेच्या विश्वासाची स्पष्ट मोहोर मानली जात आहे. या आघाडीमुळे विरोधी गोटात अस्वस्थता आणि खळबळ उडाल्याचे दिसून येत आहे.
धारधार : चौकाचौकात, कट्ट्यावर एकच नाव — जयश्री थोरात
शिर्डीतील चौक, बाजारपेठा, चहाचे कट्टे आणि सोशल मीडियावर सध्या एकच नाव गाजत आहे — जयश्री थोरात.
“हा निकाल फक्त निवडणूक नाही, तर नेतृत्वावर टाकलेला विश्वास आहे,” अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे. महिला, युवक, व्यापारी आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये जयश्री थोरात यांच्या नावाला स्पष्ट पसंती मिळाल्याचे चित्र दिसत आहे.
ब्रेकिंग : अंतिम निकालाची औपचारिकता बाकी; शिर्डीला पहिली महिला नगराध्यक्षा?
मतमोजणी अद्याप अंतिम टप्प्यात असली तरी, जयश्री थोरात यांचा विजय आता केवळ औपचारिकतेवर आला आहे, अशी भावना शिर्डीकरांमध्ये व्यक्त होत आहे. अधिकृत निकाल जाहीर झाल्यानंतर शिर्डी शहराला एक सक्षम, अनुभवी आणि जनतेच्या विश्वासावर निवडून आलेली नगराध्यक्षा मिळणार, अशी चर्चा जोर धरत आहे.
दरम्यान, प्रशासन हाय अलर्ट मोडवर असून, निकाल जाहीर होईपर्यंत शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button