Letest News
कामाच्या शोधात आलेल्या तरुणावर शिर्डीत रक्तरंजित हल्ला-पेरूच्या कारणावरून डोक्यात फळी घालून ठार मारण... EXCLUSIVE: भोंदू ‘कॅप्टन’चा आणखी एक कारनामा? साई संस्थानशी संबंधित कर्मचाऱ्याची संशयास्पद आत्महत्या भोंदू लिंगपिसाट अशोक खरातचा काळा कारभार उघड — कोट्यवधींच्या जमीन हडपगुन्हा दाखल-दोघे ताब्यात दोघे फर... साईनगरीत रामनवमीचा जल्लोष- लाखोंच्या गर्दीतही शिस्तीचा विक्रम!भक्तीचा महासागर शिर्डीत उसळला-प्रशासना... शिर्डीत भाविकांना लक्ष्य- मंदिरातच दागिन्यांवर डल्ला – 1.25 लाखांचा ऐवज लंपास 🔥 शिर्डीत रेशन घोटाळा उघड-दुकानदाराची दादागिरी शिगेला- नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! 78 लाखांचा कापड घोटाळा उघड-अहिल्यानगर पोलिसांची राजस्थानपर्यंत धडक कारवाई AI फोटोचा धक्कादायक प्रकार-AK-47 दाखवत इंस्टाग्रामवर दहशत पसरवण्याचा प्रयत्न-दोघांवर गुन्हा! लिंगपिसाट खरात भोंदूबाबाच्या देवस्थानाला कोट्यवधींचा निधी-प्रस्तावच गायब?  ईशानेश्वर देवस्थान प्रकरण... “घरावरचा बुलडोझर थांबला!” – शिर्डीत गरीबांना मोठा दिलासा-फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय-“फडणवीसांच्य...
क्राईमशिर्डी

कामाच्या शोधात आलेल्या तरुणावर शिर्डीत रक्तरंजित हल्ला-पेरूच्या कारणावरून डोक्यात फळी घालून ठार मारण्याचा प्रयत्न!

शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डीसारख्या जागतिक कीर्तीच्या धार्मिक स्थळी गुंडगिरीचा कळस गाठणारी धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली. कामाच्या शोधात आलेल्या एका तरुणावर केवळ पेरूच्या टोपलीला चुकून पाय लागल्याच्या किरकोळ कारणावरून निर्घृण हल्ला करण्यात आला. संतप्त आरोपींनी थेट लाकडी फळीने डोक्यात वार करत त्याला रक्तबंबाळ केले, तर इतरांनी लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंड राज्यातील बागेश्वर जिल्ह्यातील राजेंद्रसिंग आनसिंग रावत (वय 35) हा तरुण मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रात हॉटेलमध्ये काम करत होता. नुकताच तो शिर्डीत नोकरीच्या शोधात आला होता. मंगळवारी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास तो द्वारकामाईकडून गेट क्रमांक 2 कडे जात असताना रस्त्यावर फेरीवाल्यांची प्रचंड गर्दी होती.
यावेळी गर्दीतून वाट काढताना त्याचा पाय चुकून एका पेरू विक्रेत्याच्या टोपलीला लागला आणि पेरू खाली सांडले. या क्षुल्लक प्रकारावरून आरोपींनी संतापाचा स्फोट करत त्याच्यावर शिवीगाळ सुरू केली. तरुणाने वारंवार माफी मागूनही आरोपी शांत झाले नाहीत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


उलट, संतापाच्या भरात मुस्कान शेख हिने रस्त्यावर पडलेली लाकडी फळी उचलून थेट तरुणाच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. या हल्ल्याने तो जागीच कोसळला आणि डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. त्यानंतर फरिदा शेख आणि सोहेल शेख यांनी त्याला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करत दादागिरीचा कळस गाठला.
भरदिवसा, लोकांसमोर उघडपणे झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर सुरक्षा रक्षकांनी तातडीने हस्तक्षेप करत जखमी तरुणाला अॅम्बुलन्सद्वारे रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्या डोक्याला तब्बल आठ टाके पडल्याचे स्पष्ट केले असून प्रकृती चिंताजनक नसल्याची माहिती आहे.
या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 0214/2026 नोंद करण्यात आला असून मुस्कान शेख, फरिदा शेख आणि सोहेल शेख (सर्व रा. शिर्डी) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 118(2), 115(2), 352 व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


⚠️ शिर्डीत कायद्याचा धाक संपला का?
किरकोळ कारणावरून थेट जीवघेणा हल्ला होणे ही अत्यंत गंभीर बाब असून शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
🔥 माफी मागूनही मारहाण — दादागिरीचा कळस
पीडित तरुणाने चूक मान्य करून माफी मागूनही आरोपींनी अमानुष मारहाण केल्याने ही घटना केवळ वाद नसून सरळ गुंडगिरी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
🛑 प्रशासनाने आता तरी जागे व्हावे!
अशा घटनांमुळे शहराची प्रतिमा मलिन होत असून प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करून फेरीवाल्यांवर नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button