Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
क्राईमशिर्डी

दत्तनगर जवळ ‘सोरट’ जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धडक छापा चौघे जेरबंद

शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डी शहरातील दत्तनगर परिसरात सुरू असलेल्या अवैध ‘सोरट’ जुगार अड्ड्यावर शिर्डी पोलिसांनी नियोजनबद्ध छापा टाकत चौघांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त करण्यात आले असून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


🔎 गोपनीय माहितीवरून आखली सापळा कारवाई
दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी पोहेका २१७८ राहुल राजेंद्र द्वारके, पोसई दीपक मेढे व पोना २२९३ राहुल कचरू डोके हे शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पेट्रोलिंग करत होते.
दरम्यान, पोना राहुल डोके यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अखिल भारतच्या पाठीमागे दत्तनगरजवळील पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम ‘सोरट’ नावाचा हारजीतीचा जुगार खेळत आहेत आणि तात्काळ छापा टाकल्यास मुद्देमालासह मिळून येतील.
माहिती खात्रीलायक असल्याने पोलिसांनी तात्काळ दोन पंचांना बोलावून कारवाईचे नियोजन केले.

⏰ सायंकाळी ६:११ वा. अचानक छापा
पोलिस पथकाने आवश्यक साहित्य (लॅपटॉप, प्रिंटर, पंचनामा साहित्य) सोबत घेतले. खासगी वाहन अलिकडे उभी करून पथकाने पायी जाऊन सायंकाळी ६:११ वाजता पत्र्याच्या शेडवर अचानक छापा टाकला.
त्या वेळी चार इसम खाली बसून ‘सोरट’ जुगार खेळताना दिसून आले. पोलिसांनी त्यांना जागीच थांबवून पंचांसमक्ष ओळख सांगितली व कारवाईचा उद्देश स्पष्ट केला.

👥 आरोपींची ओळख
कारवाईत खालील चार जणांना ताब्यात घेण्यात आले —
आकाश कैलास राजपूत (वय ३०)

किरण सुनील कडू (वय ३०)
अविनाश कारभारी बाणेदार (वय २७)
चौकशीत आकाश राजपूत याने सदर जुगार स्वतः चालवत असल्याचे सांगितले.

💰 रोख रक्कम व साहित्य जप्त
पंचासमक्ष अंगझडती घेतली असता आरोपींकडून एकूण ₹२,९८०/- रोख रक्कम (विविध दराच्या नोटा) तसेच ‘सोरट’ खेळण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आले.
सदर मुद्देमाल पंचासमक्ष जागीच जप्त करण्यात आला असून त्यावर पोलीस अधिकारी व पंचांच्या स्वाक्षऱ्यांचे कागदी लेबल लावण्यात आले. आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

⚖️ गुन्हा दाखल
या प्रकरणी शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुरनं. १४४/२०२६ प्रमाणे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

🚨 अवैध जुगारांविरुद्ध मोहिम कायम
शिर्डी परिसरात वाढत्या अवैध जुगार अड्ड्यांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून अशा प्रकारचे धंदे चालविणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button