Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
अ.नगरराजकीय

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत आस्पायर कुस्ती संकुलचा दबदबा!मालेगावच्या सर्वच पैलवानांची विजयी कामगि

मालेगाव (प्रतिनिधी) – आखाड्यातील दमदार डावपेच, अंगातील रग आणि विजयाची जिद्द यांच्या जोरावर मालेगाव येथील आस्पायर कुस्ती संकुलच्या सर्वच पैलवानांनी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत दणदणीत विजय मिळवत संकुलाचा नावलौकिक उंचावला. एकाच स्पर्धेत सर्व पैलवानांनी विजय मिळविल्याने कुस्तीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या यशामागे पैलवानांची कठोर मेहनत, नियमित सराव आणि वस्तादांचे अचूक मार्गदर्शन यांचा मोठा वाटा आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

आखाड्यात घाम गाळून केलेल्या मेहनतीचे रूपांतर विजयात झाल्याने आस्पायर कुस्ती संकुलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
पैलवानांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थापक अरुणजी भोसले, खलिफा विजय गवळी, वस्ताद हनुमंत लोंढे आणि वस्ताद बब्बू सय्यद यांनी सर्व विजयी पैलवानांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
“आखाड्यातील मेहनत कधीच वाया जात नाही; आजचा विजय ही उद्याच्या मोठ्या यशाची सुरुवात आहे,” अशा शब्दांत कुस्तीप्रेमींनी विजयी पैलवानांचे कौतुक केले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button