
मालेगाव प्रतिनिधी आशिष शर्मा
अमेरिकेत पार पडलेल्या पोलिस अँड फायर स्पर्धेत एअर पिस्तूल नेमबाजीत नाशिक पोलिस आयुक्तालयाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश गणपत हिरे यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.

त्यांनी सुवर्णपदक पटकावून पहिल्यांदाच महाराष्ट्र पोलिस दलाला या कॅटेगरीत स्थान मिळवून दिले आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल गृहमंत्रालयाकडून आता थेट सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) या पदावर हिरे यांना पदोन्नती दिली जाणार आहे, तसेच राज्यस्तरावरील छत्रपती शिवाजी महाराज पुरस्काराने शासनाकडून सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केली.
कॅलिफोर्निया पोलिस अॅथलेटिक्स फेडरेशनच्या वतीने अमेरिकेमध्ये झालेल्या २१ व्या स्पर्धेत यावर्षी ९० देशांचे खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये सीमा संरक्षण, पोलिस, जागतिक स्तरावरील पोलिस अँड फायर स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणारे महेश हिरे यांचा सत्कार करताना जलसंपदामंत्री गिरीश महाजन समवेत विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, आमदार सीमा हिरे, संदीप कर्णिक आदी
अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश होता. कस्टम अधिकारी, अग्निशमन दल आर्दीमधील भारताकडून महाराष्ट्र पोलिस दलाचे नेतृत्व हिरे यांनी केले. रविवारी (दि.२७) दुपारी फ्रावशी शाळेत आयोजित सत्कार सोहळ्यात गिरीश महाजन यांनी महेश हिरे यांचा गौरव केला. यावेळी आमदार सीमा हिरे, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक आदी उपस्थित होते.
भारत सरकारकडून चार कोटींचे बक्षीस जाहीर
या जागतिक दर्जाच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघातील स्पर्धक खेळाडूंना तब्बल ४ कोटी ३८ लाख ८५ हजार रुपयांचे प्रोत्साहनपर रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत घोषणा केली आहे.
ह्यावेळी सचिन बच्छाव देवा पाटील गिरीश करिपरा आशिष शर्मा व मित्र परिवाराकडून हिरे यांचा सन्मान करण्यात आला.