शिर्डी प्रतिनिधी/ मी आंतरजातीय लग्न केले म्हणून व किरकोळ कारणावरून मी माझे पती सासू-सासरे घरात असताना अचानक माझ्या नात्यातील लोकांनी किरकोळ कारणावरून
घरी येऊन मी गरोदर असताना मला व माझ्या घरच्यांना (१राजू वसीम इनामदार(२ अमीर शकील शेख्(३ नारायण बन्सी खंडीझोड(४प्रतीक बाळासाहेब साबळे सर्व राहणार वेस कोपरगाव यांनी घरासमोर येऊन २५ एप्रिल रोजी हातात काठ्या व तलवारी घेऊन एकत्र येऊन मोठ्या मोठ्याने ओरडून घरा गोंधळ घालून ते म्हणाले की तुम्हाला तलवारीने जिवे मारून टाकू तुम्ही चुकीचे लग्न केले आहे तुम्हाला शिक्षा भोगवीच लागेल
असे किती दिवस वाचणार आहे असे म्हणून शिविगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली व घरावर हल्ला केला अशी तक्रारार गरोदर विवाहित महिला संगीता लक्ष्मण खंडीझोड वय २० राहणार धंदा घरकाम वेस कोपरगाव या महिलेने शिर्डी पोलिसात दिल्याने शिर्डी पोलिसांनी
या चार जणांच्या विरोधात भादवी ३२३,५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल केला असून शिर्डी पोलिसांनी मला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे अधिक तपास शिर्डी पोलीस करीत आहे