Letest News
सावळी विहीरमध्ये घरफोडीचा थरार- कडी-कोयंडा तोडून चोरट्यांचा धुमाकूळ ! शिर्डीत भरदिवसा रक्तरंजित थरार- दुकानदारावर जीवघेणा हल्ला कॉकरोच जनता पार्टी”मुळे देशभरात बेरोजगारांचा संताप उफाळला-८ मिलियन तरुण एकवटले! साई संस्थानवर गंभीर... साकुरीतील ‘त्या’ क्लबचा पुन्हा स्फोट- राजकीय वरदहस्तामुळेच ‘त्या’ क्लबला अभय? नागरिकांमध्ये संताप राहाता पोलिसांची मोठी कारवाई-साकुरीतील क्लबवर छापा- रम्मी जुगार खेळताना तिघे रंगेहात ताब्यात गर्भलिंग रॅकेटमधील अनेक संशयित फरार-पोलिसांची मोठी धरपकड मोहीम सुरू राहुरीत दरोड्याच्या तयारीत टोळी जेरबंद; एलसीबीची धडाकेबाज कारवाई! शिर्डी-राहाता कनेक्शन उघड तीन आरोप... पेट्रोल-डिझेल संपणार? अफवांनी जिल्हा पेटला प्रशासनाचा सज्जड इशारा! शिर्डीत दोन्ही शिवसेना गट आमनेसामने-शिर्डीत तणावाचे वातावरण जागेच्या बांधावरून वाद- शेकडो तरुणांचा भ... “दोन मिनिटांत दर्शन”च्या आमिषाने साईभक्तांची लूट १९०० रुपयांचा हार विक्रीप्रकरण गाजलं!
अ.नगरक्राईम

साकुरीतील ‘त्या’ क्लबचा पुन्हा स्फोट- राजकीय वरदहस्तामुळेच ‘त्या’ क्लबला अभय? नागरिकांमध्ये संताप

राहाता तालुक्यातील साकुरी येथे सुरू असलेल्या कथित जुगार अड्ड्यावर अखेर राहाता पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा छापा टाकला. नुकतेच राहाता पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक दिपक सरोदे यांनी अवैध धंद्यांविरोधात थेट मोहीम उघडली असून, हॉटेल आठवण परिसरात सुरू असलेल्या रम्मी क्लबवर टाकलेल्या रेडमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या कारवाईत दत्तात्रय सूर्यभान भोंगळ, किशोर विठ्ठल भंगणे आणि संजय दत्तात्रय राऊत यांना ताब्यात घेत ४१ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी २० ते २२ जण जुगार खेळत होते आणि लाखोंची रोकड फिरत होती, अशी जोरदार चर्चा शहरभर सुरू आहे. त्यामुळे “नेमके किती जणांना सोडण्यात आले?”, “मुख्य खेळाडूंना वाचवले का?” आणि “खरा आकडा दडपला जातोय का?” असे संतप्त सवाल आता नागरिक उघडपणे विचारू लागले आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


विशेष म्हणजे, हा क्लब एका राजकीय व्यक्तीच्या आश्रयाखाली चालत असल्याची चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहे. याच ठिकाणी यापूर्वीही अनेकदा पोलिसांनी छापे टाकले होते. मात्र प्रत्येक वेळी काही दिवस शांतता आणि नंतर पुन्हा नवीन जागेत क्लब सुरू, असा प्रकार सातत्याने घडत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, “सामान्य माणसावर लगेच गुन्हा दाखल होतो, मग या क्लबचा खरा मालक कोण? त्याच्यावर कारवाई का होत नाही?”

असा सवाल आता थेट पोलिस प्रशासनाला विचारला जात आहे. राजकीय वरदहस्त, आर्थिक ताकद आणि स्थानिक दबावामुळेच संबंधित मुख्य सूत्रधार प्रत्येक वेळी बचावतो का, अशी चर्चा आता उघडपणे रंगू लागली आहे.
राहाता शहर आणि साकुरी परिसरात अवैध जुगार, क्लब आणि रात्रीच्या संशयास्पद हालचालींबाबत वारंवार तक्रारी समोर येत असताना आता पोलीस निरीक्षक सरोदे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. फक्त छोटे खेळाडू पकडून कारवाईचा देखावा करायचा की या अवैध साम्राज्यामागील मोठ्या चेहऱ्यांवरही गुन्हे दाखल करायचे, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

राहाता पोलिसांसमोर विश्वास परत मिळवण्याचे मोठे आव्हान ⚠️
राहाता शहर आणि परिसरात गेल्या काही वर्षांत जुगार अड्डे, गुटखा तस्करी, अवैध क्लब आणि बेकायदेशीर धंद्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात वाढल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. यामुळे “पूर्वीच्या पोलीस निरीक्षकांच्या काळात शहराची इज्जत धुळीस मिळाली” अशी संतप्त प्रतिक्रिया आता उघडपणे व्यक्त होत आहे.
नुकतेच पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक दिपक सरोदे यांनी अवैध धंद्यांविरोधात कारवाईची मोहीम सुरू केली असली तरी नागरिकांची अपेक्षा आता आणखी मोठी आहे. फक्त छोटे गुन्हेगार पकडून थांबायचे नाही, तर या अवैध साम्राज्यामागील मोठ्या सूत्रधारांवरही कठोर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
“ज्यांनी राहाता शहराची प्रतिमा खराब केली, त्यांच्यावर आता कायदेशीर चाबूक चाललाच पाहिजे,” अशी भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. जुगार, गुटखा तस्करी, अवैध क्लब, मटका आणि रात्री सुरू असलेल्या संशयास्पद हालचालींवर पोलिसांनी मोठी मोहीम उघडावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

⚠️ नूतन पोलीस अधीक्षकांनी तात्काळ लक्ष घालावे! ⚠️

राहाता तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चाललेले जुगार अड्डे, गुटखा तस्करी, अवैध क्लब आणि बेकायदेशीर व्यवसायांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. साकुरीसह राहाता परिसरात अनेक ठिकाणी खुलेआम अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत.

नुकतीच पोलिसांनी जुगार अड्ड्यावर कारवाई केली असली तरी मुख्य सूत्रधार अजूनही मोकाट असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. “फक्त छोटे लोक पकडून कारवाईचा देखावा होतोय का?” असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे.

नागरिकांची मागणी आहे की, नूतन आलेल्या पोलीस अधीक्षकांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून राहाता तालुक्यातील सर्व जुगार अड्डे, गुटखा तस्करी, अवैध क्लब व इतर बेकायदेशीर धंद्यांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा तरुण पिढी आणि सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button