Letest News
रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा ६०-७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे तोडू नयेत-सातबारा देण्याची मागणी शिर्डीत हरवलेले मोबाईल शोधून देण्यात पोलिसांचे कौतुकास्पद काम
अ.नगरक्राईम

विश्वास नांगरे पाटील यांचा चेहरा वापरुन फसवणूक एका वृद्ध दाम्पत्याला 78 लाख 60 हजार रुपयांचा गंडा

विश्वास नांगरे पाटील यांचा एआय चेहरा वापरुन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’द्वारे खोटा चेहरा बनवून नांगरे पाटील बोलत असल्याचं भासवत छत्रपती संभाजीनगर येथील एका वृद्ध दाम्पत्याला गंडा घालण्यात आला. धक्कादायक म्हणजे पीडित दाम्पत्यापैकी पती हा सेवानिवृत्त सरकारी अधिकारी आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

विभागीय आयुक्त कार्यालयातून सेवानिवृत्त झालेला छत्रपती संभाजीनगर येथील एक वरिष्ठ अधिकारी आणि त्याच्या पत्नीला व्हिडिओ कॉलवरुन फसवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दहशतवाद्यांच्या खात्यातून तुमच्या बँक खात्यात संशयास्पद 20 लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचा बनाव करण्यात आला.

दोन ते सात जुलै या काळात सातत्याने फोन करुन त्यांना डिजिटल अरेस्टची भीती घालण्यात आली. आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलासहा दिवसात सायबर गुन्हेगारांनी दाम्पत्याला 78 लाख 60 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे. या प्रकरणी क्रांती चौक पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button