Letest News
अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर पथकाची धडक कारवाई-गावठी कट्टा विक्रीसाठी दोन इसमांचा पर्दाफा... राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला 55 कोटींचा महाघोटाळा —तेच लोक आज राजकारणात मोठ्या खुर्च्या घेण्यासाठी धाव घेतायत.- लोकांना फसवणारे ह... प्रभाग २ क मध्ये ‘सक्षम प्रभाग – विकसित प्रभाग’चा नवा आवाज किटली चिन्हाचे उमेदवार सतीश उर्फ नंदू गों... अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा बदल : 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या — कोर्टातील अपीलचा परिणाम प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — श... तीन दिवस तळीरामांचे ‘दिवे लागले’ — जिल्हाधिकाऱ्यांचा कोरडा दिवस आदेश जाहीर मतदान मतमोजणी आणि मतदानाप... राहाता नगरपरिषद : “जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना झाडू घेऊन हद्दपार करा!” — रामनाथ सदाफळ (आप) सुनील निवृत्ती पाटील शिंदे यांचा प्रचंड दावा : “प्रभाग २ मध्ये नंदूभाऊंचा विजय ठरलेलाच… विरोधकांची ब... एआय बनावट वन्यप्राणी व्हिडिओवाल्यांना थेट जेल — एसपी सोमनाथ घार्गे यांची कडक सूचना”
क्राईम

साई नगरीत चक्क साईभक्त भाविकांच्या अंगावर साप सोडण्याचा प्रयत्न ,साईभक्त भयभीत पण साप प्लास्टिकचा निघाला आणि वाद थेट पोलिस स्टेशनला गेला

साई नगरीत चक्क साईभक्त भाविकांच्या अंगावर साप सोडण्याचा प्रयत्न

शिर्डी  प्रतिनिधी /
  साईभक्त प्रभुदास भोईर रा पनवेल हे साईभक्त  साईच्या  दर्शनासाठी  सहकुटुंब शिर्डीत आले होते.साईबाबा दर्शनानंतर ते आपल्या कुटुंबासमवेत साईमंदिर परिसरात फिरत असताना या कुटुंबातील एका मुलांच्या जवळ तेथे असलेल्या काही टार्गट मुलांनी प्लास्टिकचा साप धरला  असता त्या साईभक्ताने याची  विचारणा केली असता काही टार्गट तरुणांनी एकञ येत या कुटुंबातील सदस्यांशी शाब्दीक बाचाबाची केली व त्यानंतर त्या साईभक्तांना  मारहाण केल्याची फिर्याद शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल करण्यात  आली आहे.शिर्डी पोलीस स्टेशनला प्रभुदास अर्जुन भोईर यांनी  फिर्याद दाखल केली असुन यात म्हणले की मी व माझे कुटुंब पत्नी व मुली हया श्री साईबाबा समाधी मंदीर चे बाहेर हनुमान मंदीराचे पाठीमागुन पायी जात असताना यातील आरोपी कृष्णा मोरे राहणार गणेशवाडी शिर्डी,ऋषीकेश राजेंद्र तुरकणे  राहणार पिंपळवाडी व सिद्धार्थ भागवत साळवे राहणार पिंपळवाडी रोड शिर्डी हे आले व आरोपी यांनी रस्त्यात आडवुन त्याचे हातातील प्लॅस्टीकचा साप साईभक्त यांचे मुलीचे जवळ धरला त्यामुळे फिर्यादी यांनी त्यांना विचारले की तु असे का करतो असे विचारलेचा राग आरोपीस   आल्याने त्यांनी साईभक्त व त्यांचे पत्नी व मुली यांना धक्काबुक्की करुन शिवीगाळ दमदाटी करुन मारहाण केली. त्यावेळी आरोपी क्र 2 व 3 हे पण तेथे होते त्यांनी पण शिवीगाळ मारहाण केली व बघुन घेतो असा दम दिला वैगरे मजकुरची फिर्यादी वरुन गुन्हा रजि नंबर भादवी कलम ३४१,३२३,५०४,५०६प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अश्या प्रकारे हे टारगट मुले शिर्डीत  भाविकांना त्रास देत असतील तर शिर्डीत येणाऱ्या भक्तांवर परिणाम होईल अशी चर्चा सध्या शहरात होऊ लागली आहे. आधीच शिर्डीत गर्दी नसल्याने  काही दिवसात मारहाणीच्या ,  तलवार घेऊन फिरणे , हाणामारी खुनी हल्ला असे प्रकार  शिर्डीत गेल्या पंधरा दिवसांपासून घडतं असलेल्या घटना मुळे  साईभक्त भयभीत झालेले आहेत यामुळे  भक्त मोठ्या श्रद्धेने श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतो यामुळे शिर्डी शहरात साईभक्त सुरक्षीत राहावा यासाठी अशा  व्यक्तीच्या विरोधात योग्य ती कडक कारवाई झाली पाहिजे अशी अपेक्षा या साईभक्तांनी व्यक्त केली आहे.तर साईभक्तांशी घडलेल्या अशा गंभीर घटनेत महिलांना धक्काबुक्की केल्याचे कलम लावले गेले नाहीत यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ही प्रश्न उभे राहत आहे.
शिर्डी शहरात अनेकदा साईभक्तांची लूट होणे , त्यांची फसवणूक होणे यासह त्यांना मारहाण करण्यासारखे प्रकार घडत असुन यात बाहेरून आलेले साईभक्त नको ते पोलीस स्टेशन म्हणून परतीचा प्रवास करणे पसंत करतात आणि याच कारणांमुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढत असुन अशा अपप्रवृत्तीवर वेळीच लगाम घालावा अन्यथा शिर्डी शहरातील वाढती गुन्हेगारी कळस गाठेल व शहराचे  नाव   खराब होईल अशी भिती काही सुज्ञ नागरिक व्यक्त करत आहे म्हणून ह्या जिल्ह्याला कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक नेमण्याची काळाची गरज निर्माण झाल्याची साईभक्तांची भावना झाल्या आहेत 

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button