महिलेचे दहा लाख 13 हजार रुपये किमंतीचे सोन्या-चांदीचे दागिने व मोबाईल रोख रक्कमेची पर्स सह चोरी!

शिर्डी( प्रतिनिधी) शिर्डी येथून एका हॉटेलच्या ओपन प्लेस मध्ये सुरू असलेल्या समारंभ कार्यक्रमातून चाळीसगाव जळगाव येथील एका महिलेचे सुमारे दहा लाख 13 हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने मोबाईल व रोख रक्कम पर्स अज्ञात इसमाने चोरून नेल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात शिर्डी पोलीस ठाण्यात कविता पंकज सुराणा राहणार घाटरोड चाळीसगाव ,जिल्हा जळगाव यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की, आपण 28 नोव्हेंबर 2023 रोजी आपल्या कुटुंबासह शिर्डी येथे येथील आपली बहीण अर्चना ताराचंद जैन राहणार नाशिक रोड यांच्या मुलाच्या संगीताचा कार्यक्रम शिर्डीतील हॉटेल तनिया रेसिडेन्सी इन येथील ओपन प्लेस मध्ये होता. आम्ही कुटुंबासह हा कार्यक्रम एका सोपा वर बसून पाहत असताना शेजारीच माझी पर्स ठेवली होती.माझ्या पर्समध्ये आमचे सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल, रोख रक्कम असा सुमारे दहा लाख तेरा हजार रुपये किंमतीचा ऐवज होता.
रात्री आठ ते पावणे दहाच्या दरम्यान कोणीतरी अनोळखी ईसमाने हा ऐवज पर्स सह चोरून नेला आहे. या पर्समध्ये 90 हजार रुपये किमंतीची सोन्याची कर्णफुले, तीस हजार रुपये किमंतीचा गळ्यातील सोन्याचा हार, दोन लाख चाळीस हजाराच्या सोन्याच्या बांगड्या, तीन लाखाचे मंगळसूत्र, तीन लाखांच्या सोन्याच्या बांगड्या, 30000 चे मंगळसूत्र ,पायातील चांदीच्या तीन हजाराच्या पट्ट्या, यासह दहा हजाराचा मोबाईल, रोख दहा हजार रुपये या पर्समध्ये ऐवज होता. अनोळखी इसमाने या पर्स सह सोन्या चांदीचे दागिने व रक्कम असा एकूण दहा लाख तेरा हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला आहे. अशा आशयाची फिर्याद कविता पंकज सुराणा यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात दिली असून या फिर्यादीनुसार शिर्डी पोलीस ठाण्यात रजि.नं. 10 59/ 2023 भादवी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास शिर्डी पोलीस करत आहेत.