ठकसेन भोप्यासह त्याचे चुलते वडील भाऊ व इतर दोघांवर शिर्डी पोलीस स्टेशनला एकूण 21 लोकांनी केला गुन्हा दाखल

शिर्डी येथील ग्रोमोर नावाची कंपनी असल्याचे बोगस भासवून गोर गरिबांना लुटणारा भुप्या पाटील सह त्याचा बाप. चुलता भाऊ आणि इतर दोघांवर शिर्डी पोलीस स्टेशनला एकूण 21 ठेवीदारांनी त्यांची फसवणूक झाल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे त्यात फिर्यादीने म्हटले आहे कि
मी अनिल रामकृष्ण आहेर राहणार शिर्डी श्री साई बाबा संस्थान शिर्डी येथे नोकरीस आहे.
माझे सोबत श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथे (१) राजाराम भटू सावळे रा. एअरपोर्टरोड, शिर्डी (२) सुबोध सुकदेव पाटील उर्फ सावळे रा. नांदुर्खी रोड, शिर्डी (३) संदीप भास्कर सावळे , शिर्डी (४) भाऊसाहेब आनंदराव थोरात शिर्डी हे देखील संस्थान मध्ये नोकरीस आहेत, त्यामुळे मी त्यांना ओळखतो.
वरील चौघांनी मला तसेच श्री साईबाबा संस्थान मधील इतर नोकरीस असलेल्या अनेक लोकांना सांगीतले की, राजाराम सावळे यांचा मुलगा भुपेंद्र राजाराम सावळे याची ग्रोमोर इनव्हेस्टमेंट नावाचे कंपनी आहे, सदर कंपनीमध्ये पैसे गुंतवणुक केल्यानंतर अधिक परतावा मिळतो अशी माहिती दिली.ह्या कंपनीचे शिर्डी येथे ऑफीस असून भुपेंद्र सावळे सदर ऑफीस मधून कामकाज करतात, कंपनी आपल्या ओळखीच्या माणसाची आहे,
तुम्ही बिनधास्त गुंतवणुक करा, फसवणुक होण्याची कोणतीही शक्यता नाही, असे सांगीतले व गुंतवणुक करण्यास प्रोत्साहित केले. त्यावरून मी गुंतवणूकीसाठी तयार झालो होतो व माझी आविष्याची सर्व जमा पुंजी व काही माझ्या नातेवाईकांकड़न उसनवारी रक्कम घेवून मी गंतवणुकीसाठी दि.१०/१२/२०२४ रोजी दुपारी १२.०० ते ०२.०० वाजच्या दरम्यान वाघचौरे यांच्या मालकीची हॉटेल केबीएच ग्रँड येथे मला बोलाविण्यात आले.
त्या ठिकाणी ग्रो मोर इनव्हेस्टमेंट वतीने (१) भूपेंद्र राजाराम सावळे (२) राजाराम भट्ट सह सावळे (३) पूजा गोकळ पोटीडे (४) सुबोध सुकदेव पाटील उर्फ सावळे (५) संदीप भास्कर सावळे (६) भाऊसाहेब आनंदराव थोरात (७) अरुण रामदास नंदन असे उपस्तिथ होते. सदरची मिटींग वरील ७ लोकांनी आयोजीत केलेली होती.
सदर ठिकाणी वरील लोकांनी मला व माझी पत्नी अशांना प्रोजेक्टर स्क्रीन द्वारे ठेवीदारांख्या हितसंबंध गुतवणुकीची, परताव्याची माहिती देवन कंपनी नोंदणीकृत आहे. गुंतवणुकीचा करार होईल. आमचा सर्वांचा हितसंबंधान विश्वास संपादन केला. त्यावरून मी दि.१०/१२/२०२४ रोजी ११,८८,०००/- रुपये माझे अॅक्सीस बँक खाते संस्थांमधील सण) क्र.९२१०१०००७२८३७१५ यावरून ग्रो मोर कंपनीचे बँक खाते क्र.९२३०२००५५३९२१०९
आरटीजीएस करून गुंतवणूक केली. त्याप्रमाणे त्यांनी करार करून मला दरमहा ३,१२,०००/- परतावा देणार संरक्षण) असे सांगीतले. त्यानंतर मी माझी पत्नी दिपाली अनिल आहेर हिचे नावाने यो मोर इनव्हेस्टमेंट या कंपनीत ०६/०७/२५ २,९७,०००/- पत्नीचे अॅक्सीस बँक खाते ९२०१००६३४२२४३२ यामधून ग्रो मोर कंपनीचे बँक खाते 3 प्रमाणे 20-43वा. क्र.
९२३०२००५५३९२१०९ यावर गुतवणूक केली त्यात दरमहा ७८,०००/- परतावा देणेबाबत करार दिला. त्यानंतर मी माझा भाऊ नानासाहेब रामकृष्ण आहेर यांचे अॅक्सीस बँक खाते क्र. ९२४०१००६५५४०८६४ या वरून ग्रो मोर इनव्हेस्टमेंट कंपनीचे खाते क्र.९२२०२००००४९४६६४ यामध्ये ३,९६,०००/- रुपयांची गुंतवणुक केली त्यावर १,०४,०००/- प्रतिमाह परतावा देण्याचा करार केला आहे. वरीलप्रमाणे मी ग्रो मोर दिला आहे,
उर्वरीत कोणतीही रक्कम दिली नाही, आजपावेतो आम्ही त्यांचेकडे आमचे कोणालाही कोणतीही रक्कम दिलेली नाही, अशाप्रकारे मी १८,८१,०००/- रु.ची गुंतवणक केली असून त्यात ४,९४,०००/- परतावा मिळाला आहे, यावरून आम्ही गुंतवणुदार यांची नमूद ७ आरोपींनी आमची फसवणुक केली अशी आमची खात्री झाली आहे. त्यावरून आज रोजी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आलो आहे.
मी माझी पत्नी, माझा भाऊ अशींनी गुंतवणुक केली व त्यात वरील रकमेबाबत मागणी केली परंतु आज देतो उद्या देतो असे सांगून आजपर्यंत कोणतीही रक्कम दिली नाही. गुंतवणुक केलेल्या प्रत्येक व्यक्तीला वरील आरोपींनी फक्त एक हप्ता परतावा दिला आहे तरी दि.१०/१२/२०२४ रोजी हॉटेल केबीज ग्रैंड, शिर्डी ता. राहाता जि. अहिल्यानगर येथे इसम नामे (१) भुपेंद्र राजाराम सावळे (२) राजाराम भटू सावळे दोघे रा. एअरपोर्टरोड शिर्डी ता. राहाता
(३) पुजा गोकुळ पोटीडे रा. रमैया सोसायटी, दिंडोरी रोड, बोरगड, एकतानगर, म्हसरुळ मेरी कॉलनी, नाशिक (४) सुबोध सुकदेव पाटील उर्फ सावळे रा.नांदुर्खी रोड, शिर्डी ता. राहाता (५) संदीप भास्कर सावळे रा.नांदुर्खी रोड, शिर्डी ता. राहाता (६) भाऊसाहेब आनंदराव थोरात जुना बिरोबा रोड, शिर्डी ता. राहाता (७) अरुण रामदास नंदन स्वामी समर्थ केंद्राजवळ, वृंदावन कॉलनी, मगर हॉस्पीटलमागे, कुथवाडनगर, नाशिक
यांनी माझा विश्वास संपादन करून माझ्यासह वरील नमूद यादीप्रमाणे लोकांकडून १,६५,०४,०००/- रुपयांची गुंतवणुक करून आम्हा सर्वांची फसवणुक केली आहे म्हणून माझी वरील ७ इसमांविरुध्द तक्रार आहे. माझे गुंतवणुकीचे कागदपत्रांच्या छायांकित प्रती आज रोजी हजर केल्या आहेत. यावरून शिर्डी पोलीस स्टेशनाला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे
गुन्हा रजिस्टर नंबर 0726/2025भारतीय न्याय संहिता चे कलम 318(4),316(2),3(5), महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999,चे कलम 3 प्रमाणे वरील आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे
पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सागर काळे हे करीत आहेत शिर्डी पोलीस स्टेशनं कडून आवाहन करण्यात आलेले आहे कि ज्या गुंतवणूक धारकांचे पैशे बुडालेले असतील त्यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करावे