चौघुले आरने यांच्यावर भ्याड हल्याचे निषेद नोंदवत पोलीस उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन
शिर्डी प्रतिनिधी/
शिर्डी शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चौगुले व नगरसेवक सुरेश आरणे यांच्यावर लोणी येथे झालेल्या गंभीर भ्याड हल्ला प्रकरणी दोषींवर तात्काळ कारवाई करावी व मुख्य सूत्रधार शोधून त्याच्यावर गुन्हा दाखल करून जे तरुण समाजातील लोकांना न्याय हक्कासाठी कायम संघर्ष करीत होते त्याचे खच्चीकरण करण्यासाठी ज्या पद्धतीने मारहाण केली असून हा प्रकार अन्यायकारक असून पोलीसांनी आरोपीचा शोध घेऊन अटक करावी अशी मागणी महाविकास आघाडी शिर्डी मतदारसंघाच्या वतीने मोर्चा काढून उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके याना निवेदन देऊन करण्यात आले आहे

त्या प्रसंगी एकनाथ गोदकर यांनी भुमिका व्यक्त करताना आपल्या भाषणात सांगितले कि शिर्डी मतदार संघात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर अश्या प्रकारे हल्ले होणे हि लाजिरवाणी बाब आहे ह्यावेळी उत्कर्षा रुपवते सचिन गुजर प्रविण आल्हाद सुरेश थोरात अविनाश शेजवळ सिमोन जगताप यांनी आपल्या भाषणातून निषेध व्यक्त केला ह्यावेळी सुनील परदेशी सचिन कोते मुन्ना फिटर सुयोग सावकारे आदीसह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी विविध मान्यवरानी आपली भुमिका व्यक्त केली ह्यावेळी संपूर्ण तालुक्यातून महाविकास आघाडी सह अनेक संघटनांचे पदाधिकारी उपस्तिथ होते ह्या वेळी अनेक मान्यवरांचे भाषणे झाले
अश्या प्रकारे भ्याड हल्ले करणे हे लोकशाहीला घातक आहे विचारांची लढाई विचारांनी व्ह्यायला पाहिजे अश्या प्रकारे हल्ले करून तालुक्यात दहशद माजवणे व ह्यातील आरोपींना पाठीशी घालणे हे अत्यंत निंदनीय आहे हल्ला करणाऱ्यावर गुन्हा दाखल करून अटक होण्यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी अनेकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या

