Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
राजकीयशिर्डी

मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ

शिर्डी | प्रतिनिधी :
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी, नाट्य रसिक मंच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा गुरुवारी (दि. १३ ऑगस्ट) मंगलमय व भक्तिमय वातावरणात शुभारंभ झाला. दि. १३ ते २० ऑगस्ट या कालावधीत चालणाऱ्या या पारायण सोहळ्यामुळे श्रींच्या पावन नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

sai nirman
जाहिरात

पारायण सोहळ्याच्या प्रारंभी सकाळी समाधी मंदिरातून श्री साईसच्चरित ग्रंथ व श्री साईबाबांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक हनुमान मंदिर व द्वारकामाई मार्गे श्री साईआश्रम (१ हजार रुम) येथील पारायण मंडपापर्यंत नेण्यात आली.

DN SPORTS

kamlakar

या मिरवणुकीत श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी श्री साईसच्चरिताची पोथी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी वीणा, प्रशासकीय अधिकारी संदिपकुमार भोसले व प्रभारी कामगार अधिकारी शरद डोखे यांनी श्रींची प्रतिमा, तर मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या सुविद्य पत्नी सौ. वंदना गाडीलकर यांनी कलश घेऊन सहभाग घेतला.

मिरवणुकीदरम्यान ढोल-ताशे, टाळ-मृदंगाचा गजर आणि साईनामाचा जयघोष यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. श्रींच्या नामस्मरणात तल्लीन झालेल्या साईभक्तांनी मोठ्या उत्साहाने मिरवणुकीत सहभाग घेतला.

यावेळी नाट्य रसिक मंच, शिर्डीचे पदाधिकारी, शिर्डी ग्रामस्थ तसेच साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीसाईसच्चरिताच्या वाचन-श्रवणातून साईभक्तांना अध्यात्मिक समाधान व सकारात्मक ऊर्जा मिळावी, या भावनेने आयोजित करण्यात आलेल्या या पारायण सोहळ्यात पुढील काही दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

श्री साईबाबांच्या पावन भूमीत सुरू झालेल्या या भक्तिमय सोहळ्यामुळे शिर्डी नगरीत पुन्हा एकदा ‘सबका मालिक एक’ आणि ‘श्री साईराम’च्या जयघोषाने आध्यात्मिक वातावरणाची अनुभूती येत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button