Letest News
रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा ६०-७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे तोडू नयेत-सातबारा देण्याची मागणी शिर्डीत हरवलेले मोबाईल शोधून देण्यात पोलिसांचे कौतुकास्पद काम
राजकीयशिर्डी

श्री साईबाबा संस्थानला मध्य प्रदेशातील साईभक्ताचे भव्य सुवर्णदान-श्रद्धेचा तेजस्वी प्रत्यय

देश-विदेशातील भाविकांची श्री साईबाबांवर अढळ श्रद्धा
देश-विदेशातील लाखो भाविकांची श्री साईबाबांवर अढळ श्रद्धा असून, साईभक्त मोठ्या भक्तिभावाने व निस्सीम श्रद्धेने श्री साईबाबांच्या चरणी भरभरून दान अर्पण करत असतात. साईचरणी अर्पण होणारी प्रत्येक भेट ही केवळ दान नसून, ती श्रद्धा, सेवाभाव आणि आत्मिक नात्याचे प्रतीक असते. अशाच श्रद्धेचा प्रत्यय पुन्हा एकदा श्री साईबाबा संस्थान, शिर्डी येथे पाहायला मिळाला.

sai nirman
जाहिरात

■ मध्य प्रदेशातील साईभक्ताकडून आकर्षक सुवर्ण मुकुट अर्पण
आज दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी मध्य प्रदेश राज्यातील हरदासपूर येथील साईभक्त श्री. तेज बहादुर सिंह यांनी श्री साईबाबांच्या चरणी २०० ग्रॅम वजनाचा, अत्यंत आकर्षक व सुंदर नक्षीकाम असलेला कलात्मक सुवर्ण मुकुट भक्तिभावाने अर्पण केला. सदर सुवर्ण मुकुटाची अंदाजे किंमत रु. २० लाख १६ हजार इतकी असून, त्यावरील नक्षीकाम आणि घडण पाहून भाविक मंत्रमुग्ध झाले आहेत.

■ सुवर्ण मुकुट संस्थानकडे सुपूर्द; विधिवत स्वीकार
सदर सुवर्ण मुकुट श्री साईबाबांच्या चरणी विधिवत अर्पण करून, तो श्री साईबाबा संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भिमराज दराडे यांच्याकडे अधिकृतरित्या सुपूर्द करण्यात आला. संपूर्ण प्रक्रिया संस्थानच्या नियमानुसार पार पाडण्यात आली असून, या पवित्र दानामुळे साईमंदिरातील वैभवात आणखी भर पडली आहे.

DN SPORTS

■ संस्थानतर्फे साईभक्ताचा सत्कार व कृतज्ञता व्यक्त
यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भिमराज दराडे यांनी दानशूर साईभक्त श्री. तेज बहादुर सिंह यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी संस्थानच्या वतीने त्यांच्या श्रद्धा, सेवाभाव आणि उदार दानाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. अशा भक्तिभावातून साईभक्तीची अखंड परंपरा अधिक दृढ होत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

kamlakar

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button