काँग्रेस नेत्या प्रभावती घोगरे यांचा सरकारवर निशाणा
या कार्यक्रमानंतर काँग्रेसच्या सरचिटणीस सौं. प्रभावती घोगरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.
त्या म्हणाल्या — “पद्मश्री विठ्ठलरावांचे योगदान नाकारता येणार नाही, पण सहकार हा कोणा एकट्याचा नव्हे. गाडगीळ, वैकुंठबाई मेहता आणि अण्णासाहेब शिंदे यांचे योगदानही तेवढेच महत्त्वाचे आहे.”
🏭 “सहकार एका कुटुंबाची मालकी नाही” — घोगरे यांची टीका
घोगरे यांनी विखे परिवारावर अप्रत्यक्ष टीका करत सांगितले की, “आज प्रवरा परिसरात फक्त एका कुटुंबाचे नाव घेतले जाते, मात्र ज्यांनी जमीन, पैसा आणि श्रम अर्पण करून हा कारखाना उभा केला त्यांचा विसर पडलेला आहे.”
त्यांनी पुढे म्हटलं, “सहकारी संस्था ही सर्वांची आहे, पण आता ती व्यक्तिगत मालमत्ता झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.”
🌧️ “शेतकरी बेहाल, तरी भव्य कार्यक्रमांचा खर्च का?”
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची दाणादाण उडालेली आहे, जमीन वाहून गेली आहे, पिके नष्ट झाली आहेत — अशा अवस्थेत भव्य कार्यक्रमांवर खर्च करणे योग्य नसल्याचं घोगरे यांनी स्पष्ट केलं.
त्या म्हणाल्या, “ओल्या दुष्काळाची घोषणा करणे गरजेचे असताना सरकारने कार्यक्रमांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तो पैसा वापरायला हवा होता.”
🚜 “शेतकरी शेतात; सभेत कर्मचारी वर्ग!”
घोगरे म्हणाल्या, “कार्यक्रमात दिसलेली गर्दी ही शेतकऱ्यांची नव्हती, ती संस्थांच्या कर्मचारी वर्गाची होती. खरे शेतकरी तर सध्या शेतात आहेत — आपले पिक वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.”
त्यांनी सभेतील गर्दीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
🔥 “राजकारणात गणितं बदलतात, पण आमची तत्वं नाहीत”
विखे आणि विवेक कोल्हे यांच्या एकत्र उपस्थितीबाबत विचारले असता घोगरे म्हणाल्या —
“राजकारणात समीकरणं बदलतात, पण आम्ही काँग्रेस कार्यकर्ते म्हणून आमचा लढा तत्त्वनिष्ठ पद्धतीने सुरू ठेवला आहे आणि तो पुढेही सुरू राहील.”