
शिर्डी प्रतिनिधी
दिनांक 09/7/2025 रोजी सकाळी 08/00 ते 20/00 वा पावेतो वाहतुक नियमनाचे कामी निघोज बायपास ता. राहाता येथे अवजड वाहनांची वाहतुक बायपास रोडने वळवुन देण्याची आनंद विजय पगारे यांची ड्युटी होती. ते त्याठीकाणी ड्युटीवर असताना दुपारी 02/30 ते 03/00 च्या सुमारास जेवण करण्यासाठी बॅरिगेटींग करुन पोलीस स्टेशन येथे आले.

त्यावेळी सदर पॉइंटवर कोणीही ड्युटीकरीता उपस्थित नव्हते. आनंद विजय पगारे यांना दुपारी 02/56 वा. त्यांच्या मोबाईल फोनवर शहर वाहतुक शाखा शिर्डी प्रभारी अधिकारी श्री. महेश येसेकर सो यांचा फोन आला की, तुम्हाला मी व्हीडीओ टाकले ते तुम्ही बघा असे सांगितल्याने आनंद विजय पगारे यांच्या मोबाईल फोनमधील व्हाट्सअपवर आलेले व्हीडीओ बघीतले असता त्यात एका व्हीडीओमध्ये पांढ-या रंगाची पिकअप बोलेरो तिस पाठीमागे काळ्या रंगाचे छप्पर दिसत असुन
त्यामध्ये किन्नर साईटने बसलेले एक टोपी घातलेले बाबा यांची गाडी एक अज्ञात व्यक्ती त्याचे अंगात काळा रंगाचा लाल कॉलर असलेला हाफ बाहीचा टी शर्ट व आर्मी प्रिंट असलेली पॅण्ट घातलेला असा दिसत असुन तो गाडीत बसलेला इसमास गाडी कुठे चालवली तुमच्याकडे पावती आहे का? पावत्या दाखवा असे म्हणुन त्यांच्याकडुन 50 रुपये घेताना दिसत आहे.
त्यावेळी आनंद विजय पगारे 03/15वा चे सुमारास पुन्हा निघोज बायपास ता. राहाता येथे जावून सदर व्हीडीओतील इसम कोठे दिसतो अगर खात्री केली असता तो इसम कोठेही आढळुन आला नाही. तरी सदरचा व्हीडीओ पाहून खात्री झाली की, सदर अज्ञात इसम हा आनंद विजय पगारे पॉइंटवर नसल्याचा फायदा घेवुन नमुद पिकअप वाहनाला अडवुन पोलीस असल्याचे भासवुन
त्यांचेकडुन 50 रुपये घेवुन व्हीडीओतील लोकांची फसवणुक करत आहे. आनंद विजय पगारे यांनी आजुबाजुस व्हिडीओतील पैसे घेणा-या इसामाबाबत चौकशी केली असता त्याचे नाव बनकर असल्याचे समजले आहे. म्हणुन माझी बनकर पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही याचेविरुध्द आनंद विजय पगारे वय 36 वर्षे नेम-शहर वाहतुक शाखा शिर्डी यांनी कायदेशिर फिर्याद दाखल केली आहे.