Letest News
"छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष... रस्ता अडवल्याच्या कारणावरून रक्तरंजित हल्ला-बीअरच्या बाटल्यांनी दोघांना केले रक्तबंबाळ ३० दारू धंदे अभयात एकावरच कारवाई-मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशयाची सुई! मंदिर परिसरात कोयता फिरवत दहशत-शिर्डी पोलिसांची धडक कारवाई-तरुण गजाआड
क्राईमशिर्डी

शिर्डी – महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकदा तरी दाखवून द्यावे !!

चंद्रपूरच्या महिलांचा आदर्श; शिर्डीतील महिला लोकप्रतिनिधींनीही पुढे यावे!
शिर्डीत दारूबंदी केवळ कागदावर? मुख्याधिकारी फक्त कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त असल्याचा आरोप
शिर्डी प्रतिनिधी : चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील गुडसेला गावातील महिलांनी अवैध देशी दारूविक्रीविरोधात उभा केलेला लढा राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. पोलिसांकडे वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने महिलांनी थेट दारू अड्ड्यावर धडक देत दारूचा साठा जप्त करून जागेवरच त्याची होळी केली. या धाडसी कृतीचे सर्वत्र कौतुक होत असताना, शिर्डीतही अशाच प्रकारची कारवाई होणार का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


शिर्डी हे जागतिक कीर्तीचे तीर्थक्षेत्र असूनही शहरातील अनेक भागांत अवैध दारूविक्री सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. दारूबंदीचे आदेश आणि नियम अस्तित्वात असतानाही प्रत्यक्षात अवैध दारू विक्री सुरू असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेषतः शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरत असून केवळ नोटिसा, बैठका आणि कागदी कारवाईतच व्यस्त असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीत शिर्डीत मोठ्या प्रमाणावर महिला लोकप्रतिनिधी निवडून आल्या आहेत. त्यामुळे चंद्रपूरच्या रणरागिणींप्रमाणे शिर्डीतील महिला नगरसेविकांनीही पुढाकार घेत अवैध दारू अड्ड्यांविरोधात थेट मोहीम उघडावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. “प्रशासनाने कारवाई केली नाही तर महिला रस्त्यावर उतरतील,” असा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे.


शिर्डीसारख्या पवित्र नगरीत अवैध दारूविक्रीमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असून तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई करून शिर्डीतील अवैध दारू अड्डे कायमचे बंद करावेत, अन्यथा चंद्रपूरप्रमाणे शिर्डीतही महिला आंदोलन उभारतील, अशी चर्चा शहरात सुरू आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button