Letest News
शिर्डी परिसरात गुन्हेगारांची दहशत वाढली? भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला “साईंच्या नावावर ऑनलाईन दरोडा! बनावट वेबसाईटने भाविकांची फसवणूक” “साईचरणी ९२ लाखांचा सुवर्ण मुकुट… भक्तीसमोर सोन्यालाही तेज!” “वरून सर्व सेटिंग झाली का?” — शिर्डीतून अंजली दमानियांचा सरकारला थेट सवाल साई चरणी ३५०७ किलो सेंद्रिय केशर आंब्याचे अर्पण भाविकांना तीन दिवस आमरसाची मेजवानी २.१० लाखांची सोन्याची बांगडी सापडली-महिला सुरक्षा कर्मचाऱ्याने दाखवली प्रामाणिकता शिर्डीत मोकाट कुत्र्यांचा हैदोस-संस्थान कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला-हरिभाऊ कोते यांचा इशारा ठरला खरा? शिर्डीच्या दोन दमदार व्यक्तिमत्त्वांचा गौरव-विठ्ठलराव पवार आणि दिलीप खरात सन्मानित शिर्डीत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर-गरजू रुग्णांसाठी मोठा दिलासा अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात स्मोक हँड ग्रेनेडचा स्फोट-चार प्रशिक्षणार्थी पोलीस जखमी
क्राईमशिर्डी

शिर्डी परिसरात गुन्हेगारांची दहशत वाढली? भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला

साईनगरी शिर्डीत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे चित्र समोर आले आहे. शिर्डीतील तरुण सतीष लोंढे याच्यावर मध्यरात्रीच्या सुमारास कथितपणे बीअरच्या काचेच्या बाटलीने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. हल्ल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत जीव वाचवण्यासाठी तो तरुण धावत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


“मदतीसाठी ओरडत होता, पण दहशतीमुळे कोणी पुढे आले नाही”
फिर्यादीनुसार, जखमी सतीष लोंढे हा मदतीसाठी आरडाओरडा करत होता. मात्र हल्लेखोरांच्या दहशतीमुळे कोणीही मदतीसाठी पुढे आले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका धार्मिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील तीर्थक्षेत्रात अशी परिस्थिती निर्माण होत असेल, तर सामान्य नागरिक आणि साईभक्तांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मध्यरात्रीच्या वेळी शहरातील सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे हल्ले होत असतील तर गुन्हेगारांच्या मनात पोलिसांचा धाक उरला आहे का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.


करण आव्हाड आणि सोन्या बागुल विरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 0429/2026 अन्वये करण सुरेश आव्हाड आणि किरण उर्फ सोन्या अशोक बागुल यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, करण आव्हाड याने काचेच्या बाटलीने डोक्यात प्रहार करून गंभीर दुखापत केली, तर सोन्या बागुल याने शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदविला असला तरी आरोपींविरुद्ध कठोर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


नवीन पोलीस अधीक्षकांकडून कडक कारवाईची अपेक्षा
अहिल्यानगर जिल्ह्यात नव्याने रुजू झालेल्या पोलीस अधीक्षकांसमोर शिर्डीतील वाढती गुन्हेगारी हे मोठे आव्हान ठरत आहे. साईभक्तांची नगरी म्हणून जगभर ओळख असलेल्या शिर्डीत जर गुंडगिरी, मारामाऱ्या आणि दहशतीचे प्रकार वाढत असतील, तर त्याचा शहराच्या प्रतिमेवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रवृत्तींवर लगाम घालण्यासाठी आरोपींवर कठोर कारवाई करून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जातील का, याकडे नागरिक आणि साईभक्तांचे लक्ष लागले आहे.
“साईनगरीत श्रद्धेचे वातावरण टिकवायचे असेल, तर गुन्हेगारांवर पोलादी कारवाई करावी लागेल,” अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button