Letest News
अ‍ॅक्शन मोडमध्ये पोलीस अधीक्षक! गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी 220 सराईत आरोपींचे विशेष समुपदेशन एसएस हॉटेल मधील बलात्कार व फसवणूक प्रकरणात जगताप यांची शिर्डी पोलीस ठाण्यात चौकशी समता पतसंस्थेच्या कथित बनावट खातेप्रकरणी एसआयटीचा तपास वेगात? अशोक खरातच्या ताब्याची चर्चा-अनेकांमध्... श्रीरामपूरच्या गुन्हेगारी विश्वाला मोठा हादरा! १६ गंभीर गुन्ह्यांतील 'सोन्या बेग' अखेर जेरबंद प्रेमाच्या जाळ्यात पाच वर्षे अडकवून लाखोंची फसवणूक? लग्नाचे आमिष-शारीरिक संबंध आणि 13 लाखांसह 3 तोळे... कोपरगावच्या दुय्यम कारागृहाला अखेर टाळे-२० कैद्यांची कडेकोट बंदोबस्तात नाशिकला रवानगी शिक्षणातील आर्थिक साक्षरता' : योग्य माहिती असेल तर पैशांची अडचण ठरत नाहीशिक्षण महाग नाही… योग्य नियो... दीड लाखांचे दागिने आणि व्हिसा असलेली पर्स साईभक्ताला सुखरूप परत । सोन्याचे दागिने-व्हिसा अन् प्रामाण... कट्टर शिवसैनिक नानक सावंत्र यांची जिल्हा मुष्टीयुद्ध संघटनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती-शिर्डीत अभिनंद... २२ महिने उलटले… तरीही ५९८ कामगारांना सेवा लाभ नाहीत मुख्यमंत्री फडणवीसांकडे डॉ. राजेंद्र पिपाडांची न...
अ.नगरक्राईम

प्रेमसंबंधाचा रक्तरंजित शेवट! प्रेयसीचा गळा चिरणाऱ्या आरोपीला जन्मठेप दसऱ्या लग्नाच्या तयारीतून पेटला संताप- तरुणीच्या खूनप्रकरणी आरोपी दोषी

शिर्डी | प्रतिनिधी
प्रेमसंबंध, सततचे वाद आणि दुसऱ्या लग्नाची तयारी… या सगळ्याचा शेवट एका तरुणीच्या निर्घृण हत्येत झाला. राहाता तालुक्यात 2023 मध्ये घडलेल्या गाजलेल्या खून प्रकरणात राहाता जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी अजय राजेंद्र म्हस्के याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने आरोपीस 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावला.
सावळीविहीर येथील आरोपी अजय म्हस्के याचे विवाहित महिला सविता सुनील बोरसे हिच्यासोबत मागील तीन वर्षांपासून अनैतिक संबंध होते. सविता मूळची नाशिक जिल्ह्यातील एकलहरे येथील असून ती सध्या राहाता तालुक्यातील रुई येथील भोपळे वस्तीवर राहत होती. दोघेही एकत्र राहत असताना आरोपी अजय हा दुसरे लग्न करण्याच्या तयारीत असल्याने त्यांच्या नात्यात सतत वाद सुरू होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


मृत सविता हिने आरोपीच्या त्रासाबाबत त्याच्या कुटुंबीयांकडे, माहेरच्यांकडे तसेच राहाता पोलीस ठाण्यातही तक्रारी केल्या होत्या. मात्र या तक्रारींचाच राग मनात धरून आरोपीने 16 जुलै 2023 रोजी धारदार चाकूने सविता हिच्या गळ्यावर सपासप वार करत तिचा खून केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सविताचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. 615/2023 भारतीय दंड विधान कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तत्कालीन पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ, सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील, पोहेकॉ. संदीप गडाख आणि पोकॉ कैलास राठोड यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात भक्कम दोषारोपपत्र सादर केले.


या खटल्याची सुनावणी मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश एस. गुप्ता यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्षातर्फे अॅड. व्ही. डी. पानगव्हाणे आणि अॅड. सीमा देशपांडे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. अखेर न्यायालयाने आरोपी अजय म्हस्के यास दोषी ठरवत जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली.
या खटल्यात मा. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, कोर्ट अंमलदार पोहेकॉ. सुभाष माळी, पोकॉ विशाल शिराळकर आणि पोहेकॉ. बनकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button