Letest News
शिर्डीत कथित धर्मांतर प्रकरणाने खळबळ-डि मार्ट मॉलमधील घटनेवरून वाढली चर्चा “मी नाही त्यातला!” – दीपक लोंढेची तीच जुनी पिपाणी, चौकशीत मात्र वेगळंच चित्र-लोंढेंच्या दाव्यांवर प्... शिर्डीत ‘मुंबई बिर्याणी’चा घाणेरडा खेळ उघड! बिर्याणीत गुटख्याची पुडी – खवय्यांच्या आरोग्याशी खिलवाड टपऱ्या हटवा-अन्यथा रस्त्यावर उतरू! – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इशारा अतिक्रमणाविरोधात मनसेचा एल्गा... 🏅 शिर्डीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांचा राज्यस्तरीय सन्मान 🚨 डॉ. जितेंद्र शेळके प्रकरणावरून शिर्डीत संतापाची लाट सोशल मीडियावरील आरोपांवर नागरिक आक्रमक दुर्दैवाचा दुहेरी घाव… शिर्डीचा लाडका भूमिपुत्र जितेंद्र शेळके यांच्यासह पत्नी अनुराधाताई यांचीही मृ... शिर्डीचा लाडका भूमिपुत्र हरपला… साई भक्त उद्योजक जितेंद्र शेळके यांचा समृद्धी महामार्गावर दुर्दैवी अ... लिंगपिसाट कॅप्टनच्या “पत्नीच्या खात्यातून १७ कोटींचा स्फोट!” – कल्पना खरात रडारवर शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये  “RTO नेही तीच पिपाणी वाजवली – ‘मी नाही त्यातली!’आता ‘कडी लावा आतली’ची माग...
क्राईमशिर्डी

शिर्डीत कथित धर्मांतर प्रकरणाने खळबळ-डि मार्ट मॉलमधील घटनेवरून वाढली चर्चा

शिर्डी : शहरातील डी मार्ट मॉलमध्ये काम करणाऱ्या युवकाच्या कथित धर्मांतर प्रकरणामुळे शिर्डीत मोठी खळबळ उडाली असून, या घटनेमुळे सामाजिक वर्तुळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित प्रकरण हे मागील काही वर्षांपासून  सुरू असल्याची चर्चा असून, नुकत्याच घडलेल्या एका घटनेनंतर हे प्रकरण समोर आल्याचे सांगितले जात आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


सोशल मीडिया स्टेटस ठरले संशयाचे कारण
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवकाच्या वडिलांनी ( रवी सोनवणेच्या)  मुलाच्या मोबाईलवरील सोशल मीडिया स्टेटस पाहिले असता त्यांना संशय आला. स्टेटसमध्ये मुलगा वेगळ्या धार्मिक स्वरूपात दिसत असल्याने कुटुंबीयांना धक्का बसला. यानंतर कुटुंबीयांनी स्वतःच्या स्तरावर चौकशी सुरू केली.


कुटुंबीयांचा गंभीर आरोप; दबावाखाली धर्मांतर केल्याचा दावा
चौकशीदरम्यान, युवकाने धर्मांतर केल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. तसेच, काही सहकाऱ्यांनी त्याच्यावर प्रभाव टाकून किंवा दबाव आणून हा निर्णय घ्यायला भाग पाडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
याशिवाय, युवक-युवतींचा एक गट अशा प्रकारे इतर युवकांशी संपर्क साधतो, अशीही चर्चा स्थानिक पातळीवर रंगू लागली आहे. मात्र, या सर्व दाव्यांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
स्थानिकांचा हस्तक्षेप; मॉलमध्ये जाऊन चौकशी
प्रकरणाची माहिती स्थानिक प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थांना मिळाल्यानंतर त्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष माहिती घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका व्यक्तींला  ताब्यात घेतल्याची चर्चा आहे. मात्र, यासंदर्भात कोणतीही अधिकृत पुष्टी पोलीस किंवा प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही.


पोलिसांत अद्याप गुन्हा दाखल नाही;
इतक्या गंभीर स्वरूपाच्या आरोपांनंतरही संबंधित प्रकरणात अद्याप कोणताही अधिकृत गुन्हा दाखल झालेला नसल्याचे समजते. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, “प्रकरण दडपले जात आहे का?” असा सवाल उपस्थित होत आहे.
कायद्याच्या चौकटीत चौकशीची मागणी


स्थानिक नागरिक व विविध हिंदुत्ववादी संघटनांकडून या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी होत आहे. जर कोणत्याही प्रकारे बळजबरी, फसवणूक किंवा दबाव टाकून धर्मांतर घडवून आणले असेल, तर संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी भूमिका व्यक्त केली जात आहे.मिळालेल्या माहिती नुसार ज्याचे धर्मांतर झालेले आहे त्यानेच शिर्डी पोलीस स्टेशनला जाऊनही गुन्हा दाखल केला नसल्याने मोठे पेच निर्माण झालेले आहे त्यावर कोणाचे दबाव आहे का त्याला कोणी धमकी दिलेली आहे का याचा सखोल तपास पोलिसांनी करणे गरजेचे आहे कारण कि शिर्डी हि साईबाबांच्या पावनस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे येथे सबका मालिक एक हा संदेश स्वता साईबाबांनी दिलेला आहे येथे कुठल्याही प्रकारचे जातीयताणावं निर्माण होऊ नये याची दक्षता पोलिसांनी घेऊन सत्य जाणते समोर आणण्याची गरज निर्माण झालेली आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button