Letest News
नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका...
राजकीयशिर्डी

लिंगपिसाट खरात भोंदूबाबाच्या देवस्थानाला कोट्यवधींचा निधी-प्रस्तावच गायब?  ईशानेश्वर देवस्थान प्रकरणात मोठा घोटाळा-प्रशासनाकडे कोणतीच नोंद नाही!

नाशिक | प्रतिनिधी
सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील ईशानेश्वर देवस्थानाच्या नावावर झालेल्या निधी वाटप प्रकरणाने आता गंभीर वादाचे रूप धारण केले आहे. भोंदूबाबा व विकृत गुन्हेगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात ऊर्फ कॅप्टन याच्याशी संबंधित असलेल्या या देवस्थानाला प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत तब्बल १ कोटी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र, हा निधी कोणत्या प्रस्तावाच्या आधारे मंजूर झाला, याबाबत प्रशासनाकडे कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसल्याने संशय अधिकच गडद झाला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


विशेष म्हणजे, ईशानेश्वर देवस्थानाचा पर्यटनस्थळांच्या अधिकृत यादीत समावेशच नाही. तरीही एवढ्या मोठ्या रकमेचा निधी कसा मंजूर झाला, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या प्रकरणात प्रस्ताव तयारच झाला नव्हता का, की मुद्दाम गायब करण्यात आला, यावरही संशय व्यक्त केला जात आहे.
नियमाप्रमाणे, प्रादेशिक पर्यटन विकास निधीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रस्ताव जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडे पाठवला जातो. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तो पर्यटन मंत्रालयाकडे पाठवला जातो आणि मंजुरीनंतर निधी वितरित केला जातो. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत ईशानेश्वर देवस्थानाच्या बाबतीत कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नसल्याने मोठा गैरव्यवहार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


सदर निधी शासन निर्णय क्रमांक २०१८/३/प्र.क्र. १९१ पर्यटन दि. ३१ मार्च २०१८ अन्वये मंजूर करण्यात आला असल्याचे सांगितले जात असले, तरी त्या अनुषंगाने प्रस्ताव कोणी दिला, कोणाची शिफारस होती, याबाबत प्रशासनाकडे ठोस उत्तर नाही.
यामुळे आता हा निधी राजकीय हस्तक्षेपातून मंजूर झाला का, की भोंदूबाबाच्या संबंधातून परस्पर मंजुरी देण्यात आली, असा गंभीर सवाल उपस्थित झाला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button