Letest News
साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा ‘लाचखोरीचा स्फोट!’ — शिर्डीचे प्रांत सीताराम गायकर यांचे जावई लाचखोर गोविंद शिंदे यास दिवस पोलीस कोठ... ‘रॉकेल आहे… पण स्टोव्ह नाही!’ शिर्डीत नागरिकांची अक्षरशः कोंडी लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम
क्राईमशिर्डी

रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा

शिर्डी : श्री साई रामनवमी उत्सव 2026 च्या पार्श्वभूमीवर आयोजित लावणी महोत्सवानंतर सोशल मीडियावर आक्षेपार्ह व बदनामीकारक ‘रिल’ व्हायरल करून संपूर्ण शिर्डीची प्रतिमा मलिन करणाऱ्या युवकाविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात असंज्ञेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार संजय शिंदे (रा. कालिकानगर, शिर्डी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक 28 मार्च रोजी रात्री सुमारे 8 वाजता साईबाबा संस्थानच्या मोकळ्या पार्किंगमध्ये लावणी नृत्यांगना राधा पाटील हिचा कार्यक्रम पार पडला. मात्र कार्यक्रम संपताच विशाल ताराचंद बेलदार (वय 23, रा. करडोबा नगर, शिर्डी) याने आयोजक व संस्थानावर आक्षेपार्ह, बदनामीकारक मजकूरासह ‘रिल’ तयार करून सोशल मीडियावर टाकली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


ही ‘रिल’ काही तासांतच गावभर व परिसरात तुफान व्हायरल झाली. यामुळे श्री साईबाबा संस्थान, शिर्डी ग्रामस्थ आणि रामनवमी उत्सव आयोजकांची प्रतिमा धुळीस मिळाल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
🔍 मोबाईल तपासात धक्कादायक खुलासा
पोलीसांनी संशयित विशाल बेलदार याचा मोबाईल तपासला असता, संबंधित बदनामीकारक व्हिडिओ त्याच्याच इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केल्याचे उघड झाले आहे.


⚖️ कायद्याचा फास आवळला
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 356(2) अंतर्गत एनसीआर क्रमांक 0227/2026 नोंदवण्यात आला असून, पुढील कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
🔥 शिर्डीत संतापाची लाट
धार्मिक उत्सवाच्या पवित्र वातावरणात अशा प्रकारे सोशल मीडियाचा गैरवापर करून बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button