Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
क्राईमशिर्डी

शिर्डी गॅस टंचाईप्रकरणी पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन 24 तासांचा अल्टिमेटम समीर वीर आक्रमक

शिर्डी : शिर्डी शहरातील साई गणेश गॅस एजन्सीचे  गॅस सिलेंडर वितरणाचा अक्षरशः बोजवारा उडाला असून नागरिक संतापाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. पहाटेपासून महिलांसह ज्येष्ठ नागरिक आणि कष्टकरी वर्ग गॅससाठी रांगेत उभा राहत असूनही अनेकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांचे हाल होत असून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


⚠️ काळाबाजाराचा खेळ सुरु? नागरिकांची उघडपणे तक्रार
शहरात गॅसचा नियमित पुरवठा होत नसल्याने घरपोच सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. काही ठिकाणी मागच्या दाराने जादा दराने सिलेंडर विक्री होत असल्याचा गंभीर आरोप नागरिक करत आहेत. KYC व OTP प्रक्रिया पूर्ण करूनही गॅस मिळत नसल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत. घरगुती गॅसचा वापर हॉटेल व व्यावसायिक ठिकाणी होत असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे.


🏢 पुरवठा अधिकाऱ्यांना थेट धडक; समीर वीर आक्रमक
या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष समीर वीर यांनी राहाता तालुका पुरवठा अधिकारी खरात यांची थेट भेट घेत तक्रार दाखल केली. नागरिकांची होत असलेली पिळवणूक तात्काळ थांबवावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि गॅस वितरण सुरळीत करावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली.


⏳ 24 तासांचा अल्टिमेटम; अन्यथा तहसीलसमोर आमरण उपोषण
“येत्या 24 तासांत परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार,” असा थेट इशारा समीर वीर यांनी प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे आता प्रशासन काय भूमिका घेते, याकडे शिर्डीकरांचे लक्ष लागले आहे

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button