Letest News
शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन
राजकीयशिर्डी

साईकृपेचा दुहेरी आनंद-ठाण्याच्या नार्वेकर कुटुंबीयांकडून ११ लाखांचे दोन सोन्याचे दिवे अर्पण

शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डीच्या साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा आहे. ही श्रद्धा केवळ दर्शनापुरती मर्यादित न राहता सेवा, त्याग आणि दानाच्या माध्यमातून सातत्याने व्यक्त होत असते. ठाणे येथील साईभक्त संतोष नार्वेकर यांच्या कुटुंबीयांनी साईबाबांच्या चरणी ११ लाख रुपये किमतीचे दोन सोन्याचे दिवे अर्पण करून आपल्या श्रद्धा आणि कृतज्ञतेची प्रचिती दिली.
पुत्रप्राप्तीसाठी केला नवस… मिळाला दुहेरी आनंद
दोन वर्षांपूर्वी संतोष नार्वेकर यांनी शिर्डी साईबाबांच्या चरणी पुत्रप्राप्तीसाठी नवस केला होता. वंशाला दिवा मिळावा अशी मनोभावे प्रार्थना त्यांनी केली होती.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


नार्वेकर कुटुंबाच्या श्रद्धेनुसार, साईबाबांच्या आशीर्वादाने त्यांच्या घरी एक नव्हे तर एक मुलगी आणि एक मुलगा असा दुहेरी आनंद लाभला. वरद आणि रुंदा या दोन्ही लेकरांसह नार्वेकर कुटुंबीय आज शिर्डीत दर्शनासाठी आले होते.
माध्यान्ह आरतीस उपस्थित राहून त्यांनी साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं आणि कुटुंबासह चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.


कृतज्ञतेपोटी सोन्याचे दिवे अर्पण
“मी साईबाबांकडे एक पुत्र मागितला होता. मात्र बाबांनी आम्हाला एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन अपत्ये देऊन आमचे कुटुंब पूर्ण केले. ही साईकृपेची देणगी आहे,” अशी भावना संतोष नार्वेकर यांनी व्यक्त केली.
नवस फेडण्यासाठी त्यांनी सुमारे सात तोळे वजनाचे आणि अंदाजे ११ लाख रुपये किमतीचे दोन सोन्याचे दिवे साईबाबांच्या चरणी अर्पण केले. ही देणगी त्यांनी संस्थानकडे सुपूर्द केली.


संस्थानकडून सत्कार
दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी नार्वेकर कुटुंबीयांचा शाल आणि साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार केला.
नार्वेकर परिवाराने आणलेले सोन्याचे दिवे अधिकृतपणे संस्थानच्या स्वाधीन करण्यात आले.
श्रद्धा, विश्वास आणि कृतज्ञतेचे प्रतीक
साईबाबांच्या चरणी अर्पण केलेले हे दोन दिवे केवळ सोन्याचे नसून श्रद्धा, विश्वास आणि कृतज्ञतेचे प्रतीक असल्याची भावना नार्वेकर कुटुंबीयांनी व्यक्त केली.

शिर्डीत दररोज हजारो भक्त विविध स्वरूपात सेवा व दान करत असतात. नार्वेकर कुटुंबीयांच्या या दानामुळे साईभक्तीतून व्यक्त होणाऱ्या कृतज्ञतेचा आणखी एक सुंदर अध्याय लिहिला गेला आहे.
🕉 साई राम 🙏✨

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button