Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
राजकीयशिर्डी

साईनगरीत मोफत किडनी स्टोन शस्त्रक्रिया शिबिर-गरजू रुग्णांसाठी दिलासादायक उपक्रम

शिर्डी | प्रतिनिधी
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी व ग्लोबल किडनी स्टोन फाउंडेशन, अहमदाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत किडनी स्टोन शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन शनिवार दि. १४ फेब्रुवारी ते रविवार दि. १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये मोठ्या आकाराच्या किडनी स्टोनने ग्रस्त रुग्णांवर लॅप्रोस्कोपी पद्धतीने, तर लहान आकाराच्या किडनी स्टोनने ग्रस्त रुग्णांवर साऊंड वेव्हच्या साहाय्याने लिथोट्रेप्सी शस्त्रक्रिया अत्याधुनिक शस्त्रक्रिया व्हॅनद्वारे पूर्णतः मोफत करण्यात येणार आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या शस्त्रक्रिया शिबिरासाठी पूर्व तपासणी प्रक्रिया सुरू असून, इच्छुक रुग्णांनी श्री साईनाथ रुग्णालय, शिर्डी येथील (रूम नं. २००) जनरल सर्जरी विभागाशी संपर्क साधावा. केवळ पूर्व तपासणी पूर्ण केलेल्या रुग्णांचीच शस्त्रक्रिया शिबिरामध्ये करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या शिबिराचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी केले आहे. साईबाबांच्या सेवाभावी विचारातून राबविण्यात येणारे हे शिबिर गरीब व गरजू रुग्णांसाठी दिलासादायक ठरणार आहे.


पूर्व तपासणीसाठी येताना रुग्णांनी आधार कार्ड, रेशन कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, जुने वैद्यकीय अहवाल (रिपोर्ट्स) तसेच पासपोर्ट साईज फोटो सोबत आणणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी रुग्णांनी श्री साईनाथ रुग्णालय, रूम नं. २००, शिर्डी येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा किंवा दूरध्वनी क्रमांक ०२४२३–२५८५३९, २५८५५५ यावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
🙏 साईचरणी सेवा हेच ध्येय ठेवून रुग्णसेवेसाठी संस्थान सातत्याने कार्यरत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button