Letest News
राहात्यात गर्भलिंग रॅकेटचा महाभंडाफोड-पुण्यापर्यंत पोहोचले धागेदोरे- राहता तालुक्यातील “मोठे मासे” र... साईदरबारात पुन्हा दिसली प्रामाणिकतेची झलक-१५ हजारांची पर्स साईभक्ताला सुखरूप परत इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैनस्नॅचिंग-श्रीरामपूरची टोळी जेरबंद-LCB ची धडाकेबाज कारवाई पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ समता पतसंस्थेच्या घोटाळ्यात ED ची मोठी एन्ट्री-अशोक खरातच्या लॉकरमधून कोट्यवधींचं घबाड “साईप्रसाद की भ्रष्टाचार?” प्रसादालयातील खरेदीवर गंभीर प्रश्नचिन्ह शिर्डीत फसवणुकीचा नवा डाव! गजराच्या नावाखाली भाविकांची लूट लोणीत गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश- आणखी १ डॉक्टरसह २ एजंट जाळ्यात निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती?
क्राईमशिर्डी

साईबाबांच्या दर्शनाला आलेल्या भाविकांवर डल्ला! शिर्डीत चैनस्नॅचिंग करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद-स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना लक्ष्य करून चैनस्नॅचिंग करणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. या कारवाईत आरोपीकडून २ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, एकूण ७ चैनस्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या यशस्वी कारवाईमुळे शिर्डीत सक्रिय असलेल्या गुन्हेगारी टोळ्यांना मोठा धक्का बसला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


सविस्तर माहिती अशी की, दि. १५ जानेवारी २०२६ रोजी पहाटे, धारवाड जिल्ह्यातील फिर्यादी नविनकुमार निंगारेड्डी कोनारेड्डी हे कुटुंबासह साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आले होते. दर्शन आटोपून मंदिराबाहेर पडताच हॉटेल अलौकिक परिसरात मोटारसायकलवर आलेल्या दोन इसमांनी फिर्यादीच्या आईच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून पळ काढला.
या दागिन्यांमध्ये सोन्याच्या दोन चैन व एक मंगळसूत्र, एकूण ११२ ग्रॅम वजनाचे व सुमारे ५.६० लाख रुपये किमतीचे दागिने होते. या घटनेनंतर शिर्डी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.


गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे तपास करत असताना हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार विकास उर्फ राहुल गोडाजी चव्हाण (वय ४०, रा. अशोकनगर, श्रीरामपूर) याने केल्याचे निष्पन्न झाले.


आरोपीस ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने हा गुन्हा आपल्या साथीदार गणेश विजय चव्हाण (फरार) याच्यासह केल्याची कबुली दिली. तसेच लुटलेले दागिने राखी गणेश चव्हाण (फरार) हिच्या माध्यमातून विकल्याचेही उघड झाले. आरोपीकडून १० ग्रॅम सोन्याची लगड (१ लाख रुपये) व यामाहा मोटारसायकल (१.५० लाख रुपये) असा एकूण २.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.


🔥 ७ गुन्ह्यांची साखळी उघड
तपासात आरोपीकडून शिर्डी, राहाता, संगमनेर तालुका व सिन्नर (जि. नाशिक) येथे घडलेल्या ७ चैनस्नॅचिंगच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. विशेष म्हणजे आरोपीवर यापूर्वीही अहिल्यानगर जिल्हा व तामिळनाडू राज्यात दरोडा, जबरी चोरी व दरोड्याच्या तयारीचे अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, तो तामिळनाडूमधील दरोडा प्रकरणात शिक्षा भोगून बाहेर आलेला सराईत गुन्हेगार आहे.


सध्या आरोपीस पुढील तपासासाठी शिर्डी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button