Letest News
निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद “कायदा राखणारेच झाले लाचखोर!” — पाथर्डीत पोलीसांचा काळा चेहरा उघड “१० हजारांत पोटातील भविष्य विक्रीला!” — राहाता तालुक्यात गर्भलिंग निदानाचा काळाबाजार उघड जबरदस्ती धर्मांतराचा आरोप —आरोपी ताब्यात-विविध कलमांन्वये गुन्हा दाखल- शिर्डीत खळबळ- मुंबईच्या झोपडपट्टी दादाची शिर्डीत पेट्रोल पंपावर दादागिरी -शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल “९ नाण्यांचा वाद” पुन्हा पेटला — शिर्डीत संतापाची लाट-“भीती संपली म्हणून धंदा?” — ग्रामस्थांचा थेट स...
क्राईमशिर्डी

शिर्डीत कोयता-चाकू थरार! सोंदडीबाबा मंदिराजवळ रक्तरंजित हाणामारी-तरुणांचे टोळके आमने-सामने 💥

शिर्डी | प्रतिनिधी
साईनगरी शिर्डीत गुन्हेगारीचा कहर थांबण्याचे नाव घेत नसून सोंदडीबाबा मंदिर परिसरात सायंकाळच्या वेळी कोयता व चाकूसारख्या घातक हत्यारांसह तरुणांमध्ये रक्तरंजित हाणामारी झाल्याने शहर हादरले आहे. या घटनेत दोन्ही गटांतील तरुण गंभीर जखमी झाले असून एकमेकांविरोधात परस्पर (क्रॉस) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


१७ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मंदिर परिसरात अचानक गोंधळ उडाला. जतिन घोगले याने दिलेल्या फिर्यादीनुसार, ओम सोनवणे, शुभम सोनवणे, साई सोनवणे व पप्पु ऊर्फ ज्ञानेश्वर सोनवणे यांनी शिवीगाळ करत कोयत्यासारख्या वस्तूने हल्ला केला. डोक्यावर व पायावर वार करण्यात आल्याने जतिन रक्तबंबाळ झाला, तर त्याचा मित्र आदित्य शेजवळ याच्या चेहऱ्यावर व डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली. हाणामारीदरम्यान जतिनचा मोबाईल फुटून गहाळ झाल्याचा आरोप आहे.


दरम्यान, ओम ज्ञानेश्वर सोनवणे यानेही पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत धक्कादायक आरोप केले आहेत. त्यानुसार, आदित्य शेजवळ, महेश माने, जतिन घोगले व सुमित चेहरा यांनी त्याचा भाऊ शुभम याला मारहाण केली. तसेच आदी शेजवळ याने चाकूसारख्या हत्याराने ओम व त्याच्या भावावर वार करून दोघांनाही जखमी केले. हल्ल्यानंतर “पोलीस तक्रार केल्यास जिवंत सोडणार नाही” अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे.


सार्वजनिक ठिकाणी, तेही मंदिर परिसरात, अशा पद्धतीने धारदार शस्त्रांचा वापर झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. साईनगरीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, शिर्डी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांविरोधात गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.
शहरात वाढत्या टोळक्यांच्या दहशतीमुळे सामान्य नागरिक असुरक्षित होत असून “शिर्डीत कायद्याचा धाक उरलाय तरी किती?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button