Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
राजकीयशिर्डी

श्री साईबाबा महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रम उत्साहात संपन्न

शिर्डी, दि. — :-
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था संचालित श्री साईबाबा महाविद्यालय, शिर्डी येथे दिनांक ८ जानेवारी ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या राज्यस्तरीय उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या उपक्रमाचे उद्घाटन श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से., उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भिमराज दराडे, प्र.प्रशासकीय अधिकारी श्री अतुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष औताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रंथ प्रदर्शनाद्वारे करण्यात आले.


ग्रंथ प्रदर्शनाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, ज्ञानवृद्धीसाठी प्रेरणा देणे आणि विविध विषयांवरील माहितीपर परिचय करून देणे हा होता. प्रदर्शनात श्री साईसच्चरित, शैक्षणिक, ऐतिहासिक, वैज्ञानिक, तंत्रज्ञान, कला, संगणक शास्त्र तसेच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ग्रंथ मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आले होते.


या उपक्रमात ग्रंथ भेट कार्यक्रम, सामूहिक वाचन, घोषवाक्य स्पर्धा, लेखक–वाचक संवाद, वाचन जागरूकता रॅली, पुस्तक परीक्षण स्पर्धा (लेखन व सादरीकरण) अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांचा या सर्व कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग दिसून आला आणि कार्यक्रम यशस्वी ठरला.


यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे सर्व सहकारी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाच्या प्रति उत्कटता निर्माण झाली आणि उपक्रमाची खरी उद्दिष्ट साध्य झाली.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button