Letest News
भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर- शिर्डीत 20 जूनला आंदोलन ‘एक पीडित बहीण-सोबतीला लाखो हिंदू’- शिर... साई संस्थानमध्ये ‘शिस्तीचा बुलडोझर’ CEO गोरक्ष गाडीलकर ॲक्शन मोडमध्ये नियम मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर थ... मोहरम सण शांतता-सौहार्द आणि सामाजिक सलोखा जपत साजरा करा - जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया ऑपरेशन टायगर नव्हे टायगरला आधी दात हवेत!"शिर्डीत खासदार अरविंद सावंत यांची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीक... "मी तिला मारलंय…" मित्राला केलेला फोन ठरला घातक खुनाचा पर्दाफाश-श्रीगोंदा हादरला! तरुणीचा खून करून प... श्रीरामपुरात कट्टा-काडतुसांसह दोन जण जेरबंद पोलिसांच्या संयुक्त कारवाईने मोठा अनर्थ टळला "चोरी तो चोरी-ऊपर से सीना जोरी!" – बदलीविरोधात कबाडींची मॅटमध्ये धाव- पोलिस दलात संताप "चोरी तो चोरी-ऊपर से सीना जोरी!" – बदलीविरोधात कबाडींची मॅटमध्ये धाव-पोलिस दलात संताप साईनगरीत मानवतेचा संदेश-विखे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री साईनाथ रुग्णालयात फळवाटप गोर-गरिबांच्या शिक्षणासाठी कोटभर रुपयांची जागा दान-अशोक तुरकणे यांचे दातृत्व ठरले पिंपळवाडीच्या भवित...
राजकीयशिर्डी

श्री साईबाबा संस्थान शैक्षणिक संकुलात प्रजासत्ताक दिनाचा भव्य सोहळा गोरक्ष गाडिलकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

श्री साईबाबा संस्थानच्या वतीने शैक्षणिक संकुलात प्रजासत्ताक दिनानिमित्त . गोरक्ष गाडिलकर (भा.प्र.से.) यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी त्यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत साईभक्तांच्या सेवा-सुविधांसाठी सुरू असलेल्या विविध विकासकामांची सविस्तर माहिती दिली.
🏗️ साईभक्तांच्या सेवेसाठी विकासकामांना गती

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


संस्थान कर्मचाऱ्यांचे प्रश्न लवकरच मार्गी लावणार – गाडिलकर
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडिलकर यांनी संस्थान कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही दिली. साईभक्तांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी संस्थान स्तरावर सुरू असलेल्या विकासकामांमुळे शिर्डीच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.


🎖️ परेड, कवायती व साहसी खेळांनी उपस्थितांची मने जिंकली
संरक्षण, फायर अँड सेफ्टी विभाग व विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक सादरीकरण
ध्वजारोहण कार्यक्रमात संरक्षण विभाग, फायर अँड सेफ्टी विभाग, शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी तसेच श्री साईबाबा कन्या विद्या मंदिराच्या विद्यार्थिनींनी परेड, कवायती आणि साहसी खेळांचे नेत्रदीपक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. देशभक्तीच्या वातावरणात संपूर्ण परिसर भारावून गेला होता.


🎬 ‘24 Hours in Shirdi Sai Temple’ डॉक्युमेंटरीचे अनावरण
मान्यवरांची उपस्थिती, सोशल मीडिया विजेत्यांचा गौरव
यानंतर संस्थानच्या शैक्षणिक संकुलातील सभागृहात गोपी फिल्म निर्मित “24 Hours in Shirdi Sai Temple” या शॉर्ट डॉक्युमेंटरी फिल्मचा अनावरण सोहळा पार पडला.


या वेळी गोरक्ष गाडिलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, ज्येष्ठ अभिनेत्री रती अग्निहोत्री, शिर्डी नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ. जयश्रीताई थोरात, उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी तसेच गोपी फिल्मचे निर्माते श्री. हर्ष पंड्या आदी मान्यवर उपस्थित होते.
याच कार्यक्रमात नुकत्याच पार पडलेल्या सोशल मीडिया संमेलनात आयोजित Best RIL स्पर्धेतील विजेत्या इन्फ्लुएन्सर्सना चांदीचे नाणे देऊन गौरविण्यात आले.
डॉक्युमेंटरी फिल्मच्या प्रदर्शनानंतर उपस्थितांनी भावनिक प्रतिक्रिया देत या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button