Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
राजकीयशिर्डी

शिर्डीतील समाजशील दीपस्तंभ मावळलाज्येष्ठ सामाजिक नेते कै. मारुती एकनाथ फुंदे यांचे दुःखद निधन

[12:35, 22/1/2026] ………..: ज्येष्ठ सामाजिक नेते कै. मारुती एकनाथ फुंदे यांचे दुःखद निधन
शिर्डी : शांत, संयमी आणि समाजासाठी अखंड झटणारे व्यक्तिमत्त्व आज कायमचे निघून गेले. येथील जेष्ठ सामाजिक नेते कै. मारुती एकनाथ फुंदे यांचे आज दि. 22 जानेवारी 2026 रोजी सकाळी 06.30 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ फुंदे कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण शिर्डी परिसरावर शोककळा पसरली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


कै. मारुती एकनाथ फुंदे म्हणजे माणुसकी, साधेपणा आणि सेवाभाव यांचा जिवंत आदर्श होता. कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता त्यांनी आयुष्यभर समाजासाठी काम केले. गरिबांच्या दुःखात ते आधार बनून उभे राहिले, तर तरुणांच्या वाटचालीत ते मार्गदर्शक ठरले. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे वडीलधाऱ्या माणसासारखा मायेचा हात अनेकांना लाभला.


पत्रकार राहुल मारुती फुंदे यांचे ते केवळ वडील नव्हते, तर विचारांचे बळ, संस्कारांचे शिल्पकार आणि जीवनातील प्रेरणास्थान होते. त्यांचा पितृछत्र हरपल्याने राहुल फुंदे व कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांच्या पश्चात पुत्र पत्रकार राहुल मारुती फुंदे, श्री महेश मारुती फुंदे, आप्तेष्ट, नातेवाईक असा मोठा परिवार आहे.
कै. मारुती एकनाथ फुंदे यांचा अंत्यविधी आज गुरुवार दि. 22/01/2026 रोजी दुपारी 02.00 वाजता अमरनाथ धाम, शिर्डी येथे होणार आहे.


एक निस्वार्थी समाजसेवक, मार्गदर्शक आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत असून, त्यांच्या आठवणींना डोळ्यांत अश्रूंचा अभिवादन केला जात आहे.
दैनिक साई दर्शन परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली
“कष्ट, प्रामाणिकपणा आणि माणुसकी या मूल्यांवर जगलेले कै. मारुती एकनाथ फुंदे यांचे जीवन अनेकांसाठी दीपस्तंभ ठरले. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो व फुंदे कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती देवो.”
भावपूर्ण श्रद्धांजली… 🙏

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button