Letest News
रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा ६०-७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे तोडू नयेत-सातबारा देण्याची मागणी शिर्डीत हरवलेले मोबाईल शोधून देण्यात पोलिसांचे कौतुकास्पद काम
अ.नगरराजकीय

आश्वी खुर्द येथे मातृ–पितृऋणनिर्देश सोहळा व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे भक्तिमय आयोजन

आश्वी खुर्द | प्रतिनिधी
भारतीय संस्कृतीत आई–वडिलांचे ऋण फेडणे हेच खरे पुण्य मानले जाते. याच संस्कारांची प्रचिती देणारा मातृ–पितृऋणनिर्देश व अभिष्टचिंतन सोहळा आश्वी खुर्द येथे भक्तिभावाच्या वातावरणात संपन्न होत आहे.
श्री प्रभाकर गंगाधर मांढरे (वय ९१) व सौ. सुमनताई प्रभाकर मांढरे (वय ८१) यांच्या आयुष्यातील या सुवर्णक्षणानिमित्त
सोमवार दि. १९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता
मांढरे पाटील वस्ती, आश्वी खुर्द (ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) येथे
मातृ–पितृऋणनिर्देश व अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून,
प्रमुख पाहुणे म्हणून
ना.राधाकृष्ण विखे
आ. विठ्ठलरावजी लंघे पाटील
ह.भ.प. उद्धवजी महाराज मंडलिक (संस्थापक – वरद विनायक सेवाधाम, लोणी)
शालिनीताई विखे
मा. अध्यक्षा, जिल्हा परिषद अहिल्यानगर आमदार अमोलभाऊ खताळ
यांची उपस्थिती सोहळ्याची शोभा वाढवणार आहे.
श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ – भक्ती, ज्ञान व संस्कारांचा संगम
या निमित्ताने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.


हा पवित्र सप्ताह
शुक्रवार दि. १६ जानेवारी २०२६ ते शुक्रवार दि. २३ जानेवारी २०२६
दररोज सायंकाळी ६.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत संपन्न होणार असून, त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या भागवत कथेस
ह.भ.प. रविंद्र महाराज चिकटगावकर यांचे अमृतवाणी प्रवचन लाभणार आहे.


भक्तिमय संगीत, अंतःकरण हेलावून टाकणारी भजने व कीर्तनातून
श्रोत्यांचा आत्मा रोमांचित होणार आहे.
काल्याच्या कीर्तनाने सांगता
या भक्तिमय सप्ताहाची सांगता
दि. २३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० ते १२.००
काल्याच्या कीर्तनाने होणार आहे.
संस्कारांची जपणूक – समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम
आजच्या धावपळीच्या युगात आई–वडिलांचा सन्मान, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा सोहळा
समाजाला संस्कारांची दिशा देणारा ठरणार आहे.


या सर्व कार्यक्रमासाठी
समस्त मांढरे पाटील परिवार व समस्त ग्रामस्थ आश्वी खुर्द
यांनी भाविक, भक्त व नागरिकांना हार्दिक निमंत्रण दिले आहे.
निमंत्रक
श्री. राजेंद्र प्रभाकर मांढरे
श्री. लक्ष्मीकांत प्रभाकर मांढरे
सौ. कांचनताई राजेंद्र मांढरे
समस्त मांढरे परिवार

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button