Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
राजकीयशिर्डी

स्वीकृत नगरसेवकपदी अब्रार शेख यांची निवड-ना. सुजय विखे पाटील यांचा शब्द पूर्ण

शिर्डी नगर परिषद : निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय
स्वीकृत नगरसेवकपदी अब्रार शेख यांची निवड, ना. सुजय विखे पाटील यांचा शब्द पूर्ण
शिर्डी नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी अब्रार शेख यांची निवड करण्यात आली असून, ही निवड ना. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शिर्डीच्या राजकारणात एक सकारात्मक व प्रेरणादायी संदेश गेला असून, निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी देण्याची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. या निवडीचे शहरात तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


निवडणूक काळातील शब्द प्रत्यक्षात उतरला
शिर्डी नगर परिषदेची निवडणूक मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडली होती. या निवडणुकीदरम्यान पक्ष संघटन मजबूत ठेवण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले होते. त्याच काळात तुषार गोंदकर यांना ना. सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत आश्वासन दिले होते की, सत्ता स्थापन झाल्यानंतर पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या अब्रार शेख यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली जाईल. दिलेला शब्द प्रत्यक्षात उतरवत ना. सुजय विखे पाटील यांनी अब्रार शेख यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड केली आहे.


सामाजिक व संघटनात्मक कामाची दखल
अब्रार शेख हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय व संघटनात्मक पातळीवर सक्रिय आहेत. कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता त्यांनी सामान्य कार्यकर्त्याच्या भूमिकेतून लोकांशी थेट संपर्क ठेवत विविध सामाजिक उपक्रमांत सातत्याने सहभाग घेतला. पक्षवाढीसाठी त्यांनी केलेल्या निस्वार्थ व प्रामाणिक कार्याची दखल घेतच ही निवड करण्यात आल्याचे राजकीय जाणकारांकडून सांगितले जात आहे.


सामान्य कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास
या निवडीमुळे पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांमध्ये मोठा आत्मविश्वास निर्माण झाला असून, मेहनत, निष्ठा आणि प्रामाणिकपणाला निश्चितच न्याय मिळतो, हा विश्वास अधिक बळकट झाला आहे. परिणामी पक्ष संघटनेत नवचैतन्य संचारले असून, आगामी काळात संघटन अधिक मजबूत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


अब्रार शेख यांची प्रतिक्रिया
निवडीनंतर प्रतिक्रिया देताना अब्रार शेख यांनी ना. सुजय विखे पाटील तसेच संपूर्ण विखे कुटुंबीयांचे मनःपूर्वक आभार मानले. या प्रवासात सातत्याने साथ दिल्याबद्दल तुषार गोंदकर, गणेश कोते यांच्यासह सर्व सहकारी, मित्र व कार्यकर्त्यांचे त्यांनी विशेष आभार व्यक्त केले.


शिर्डी शहराच्या विकासासाठी, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आणि नगर परिषदेच्या माध्यमातून लोकाभिमुख काम करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मोलाची साथ लाभलेले सहकारी
या यशस्वी वाटचालीत
ज्ञानेश्वर गोंदकर पाटील, तुषार गोंदकर पाटील, नितीन शेळके पाटील, गणेश कोते पाटील, योगेश जगताप पाटील, विकास गोंदकर, महेश भाऊ गोंदकर पाटील, सचिन गोंदकर पाटील, सुजित गोंदकर पाटील
यांचे मोलाचे सहकार्य व पाठबळ लाभले असल्याचे आवर्जून नमूद करण्यात आले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button