Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
राजकीयशिर्डी

शिरडी महापरीक्रमा 2026 चा ध्वजारोहण सोहळा मोठ्या थाटात पार पडला

शिर्डी : “ओम साई राम” च्या अखंड जयघोषात शिरडी महापरीक्रमा 2026 या महत्त्वाकांक्षी व भक्तिभावपूर्ण उपक्रमाचा प्रारंभ करणारा परीक्रमा ध्वजारोहण सोहळा दि. 14 जानेवारी 2026 रोजी सकाळी ठीक 9 वाजता मोठ्या थाटात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्याने संपूर्ण शिर्डी नगरी भगवामय झाली होती.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


ध्वजारोहण सोहळ्यासाठी सकाळी खंडोबा महाराज मंदिर येथे शिरडी व परिसरातील साईभक्त, ग्रामस्थ, परीक्रमा परिवार तसेच स्वयंसेवक मोठ्या संख्येने एकत्र जमले होते. तेथून शिस्तबद्ध पद्धतीने साईनामाचा जयघोष करत साईबाबा मंदिर परिसरातील गेट क्रमांक 4 जवळ सर्वजण दाखल झाले. यावेळी वातावरण पूर्णतः भक्तिभावाने भारावून गेले होते.


मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. गोरक्षनाथ गाडीलकर साहेब, सौ. जयश्रीताई थोरात तसेच शिर्डी व परिसरातील तमाम मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत पार पडला. ध्वजारोहणाच्या क्षणी उपस्थित हजारो साईभक्तांनी साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत परीक्रमा यशस्वी होण्यासाठी प्रार्थना केली.
पांढरा कुर्ता, भगवी टोपी व परीक्रमा आयकार्ड परिधान केलेल्या साईभक्तांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर भगव्या रंगात न्हाऊन निघाला होता. “साईनाथ महाराज की जय”, “ओम साई राम” अशा गगनभेदी जयघोषाने साईबाबा मंदिर परिसर दुमदुमून गेला. या दृश्याने अनेक भाविक भारावून गेले होते.


शिरडी महापरीक्रमा ही केवळ धार्मिक परंपरा नसून, ती श्रद्धा, सेवा, शिस्त आणि सामाजिक एकात्मतेचे प्रतीक मानली जाते. या परीक्रमा सेवेत सहभागी होण्यासाठी साईभक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. स्वयंसेवकांनी संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडत उत्कृष्ट नियोजनाचे दर्शन घडवले.


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शिरडी परीक्रमा परिवार, आयोजक मंडळ व स्वयंसेवकांचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले. या ध्वजारोहण सोहळ्यामुळे शिरडी महापरीक्रमा 2026 ला अधिकृत व भक्तिभावपूर्ण प्रारंभ झाला असून, पुढील काळात विविध धार्मिक, सामाजिक आणि सेवा उपक्रम साईभक्तांच्या सहभागातून राबविले जाणार आहेत.
या सोहळ्यामुळे शिर्डी नगरीत पुन्हा एकदा साईभक्तीचा जागर झाला असून, साईबाबांच्या कृपेने ही महापरीक्रमा निर्विघ्न व यशस्वी पार पडो, अशी प्रार्थना सर्वत्र व्यक्त केली जात आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button