Letest News
शिर्डीत दिवसाढवळ्या धर्मशाळेची भिंत जमीनदोस्त शिवसेना पदाधिकाऱ्यासह ५ जणांवर गुन्हा संघटित गुन्हेगारीचे कलम १११ लागू आरोपींवर 'मोक्का'सारखी कठोर कारवाई AI चा गैरवापर की राजकीय कट? पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नावाने मॉर्फ ऑडिओ-व्हिडिओ प्रकरण-संगम... शरीरात घुसला चक्क बॉलपेन- श्री साईनाथ रुग्णालयात दुर्मिळ व जीवघेण्या शस्त्रक्रियेला यश शिर्डीतील महिला हत्येनंतर माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांची काव्यात्मक टीका-सोशल मीडियावर चर्चेला उध... शिर्डीच्या भूमिपुत्री डॉ. सिमरन साई कोतकर यांची वारकऱ्यांसाठी निस्वार्थ सेवा-सर्वत्र कौतुकाचा वर्षाव शिर्डी पोलिसांचा गुटखा माफियांवर धडक प्रहार! दोन ठिकाणी एकाच वेळी छापे दोघे ताब्यात हजारो रुपयांचा ग... साई समाधीवरील चित्रीकरण प्रकरण पेटले- सखोल चौकशीसह फोटो एडिट करून विकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची ... महिलेचा खळबळजनक आरोप-बलात्कार-पिस्तुलाचा धाक जीवे मारण्याच्या धमक्या शिर्डी पोलिसांत मध्यरात्री FIR जर्मनीतील ४१ साईभक्तांची शिर्डीत भक्तीमय साईसेवा समाधी मंदिरात गुंजले साईभजन
राजकीयशिर्डी

शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते विठलराव बोडखे यांचे दुःखद निधन

शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डीतील परिचित सामाजिक कार्यकर्ते, सर्वसामान्यांचे आधारवड आणि अनेक सामाजिक उपक्रमांचे सक्रिय कार्यकर्ते विठलराव बोडखे यांचे काल रात्री दिनांक ०४ जानेवारी २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शिर्डी परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून सामाजिक, राजकीय व नागरिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
आज दुपारी २ वाजता अंत्यविधी
दिवंगत विठलराव बोडखे यांचा अंत्यविधी आज दिनांक ०५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजता शिर्डी येथील अमरधाम स्मशानभूमीत होणार आहे. अंत्यदर्शनासाठी मित्रपरिवार, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
सामाजिक कार्यात मोलाचे योगदान
विठलराव बोडखे हे सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणारे, गरजूंच्या मदतीसाठी तत्पर असणारे व्यक्तिमत्त्व होते. सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवणे, गरिबांना मदत करणे, तसेच एक शांत, संयमी आणि सर्वांना आपलेसे वाटणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ते ओळखले जात होते.
भावनिक श्रद्धांजली
त्यांच्या अकाली निधनाने मित्रपरिवार व हितचिंतकांना मोठा धक्का बसला आहे.
परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच प्रार्थना. 💐
दुःखाच्या या प्रसंगी बोडखे कुटुंबीयांप्रती साईदर्शन न्यूज तर्फे संवेदना व्यक्त करण्यात येत आहेत

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button