Letest News
रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा ६०-७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे तोडू नयेत-सातबारा देण्याची मागणी शिर्डीत हरवलेले मोबाईल शोधून देण्यात पोलिसांचे कौतुकास्पद काम
क्राईमशिर्डी

शिर्डीत कारफोडीचा थरार-सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास लक्ष्मीनगर चौकात अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ-पोलिसांसमोर आव्हान

शिर्डी (प्रतिनिधी) – साईनगरी शिर्डीत पुन्हा एकदा चोरट्यांनी डोके वर काढत कारफोडीचा धक्कादायक प्रकार घडवून आणला आहे. लक्ष्मीनगर चौक परिसरात भर वर्दळीच्या ठिकाणी उभी असलेली इनोव्हा कार फोडून अज्ञात चोरट्यांनी 1 लाख १७ हजार रुपयांचा मौल्यवान मुद्देमाल लंपास केल्याने शहरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
🚗 भर रस्त्यात उभी कार फोडली; चोरट्यांची निर्ढावलेली हिंमत
आयफोन १६, चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरीला
फिर्यादी शुभम सुभाष पाटकर (वय ३९, व्यवसाय – डिजिटल मार्केटिंग, रा. छत्रपती संभाजीनगर) यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची इनोव्हा कार (MH 20 BN 1615) लक्ष्मीनगर चौक येथून कनकरी रोडकडे जाणाऱ्या नाल्यालगत पार्क केली असताना, अज्ञात चोरट्याने कारच्या डाव्या बाजूच्या पाठीमागील दरवाज्याची काच फोडली.
⏰ अवघ्या दीड तासांत चोरी; चोरट्यांनी साधली संधी
रात्री ८ ते ९.३० दरम्यान प्रकार, परिसरात भीतीचे वातावरण
दि. १ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८ ते ९.३० या अवघ्या दीड तासांच्या कालावधीत चोरट्याने कारमधील पर्स लंपास करत त्यामधील चांदीचे दागिने, रोख रक्कम, आयफोन १६ व महत्त्वाची कागदपत्रे असा मोठा मुद्देमाल चोरून नेला. नववर्षाच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी हा प्रकार केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
👮‍♂️ शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल; तपासाला गती
BNS 2023 अंतर्गत गंभीर कलमे; सीसीटीव्ही तपासणी सुरू
या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात BNS 2023 चे कलम 303(2), 324(4) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा रात्री १०.४२ वाजता नोंदविण्यात आला आहे.
प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ चव्हाण तपास करीत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सलग कारफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

sai nirman
जाहिरात

“तिसऱ्या डोळ्याच्या सहाय्याने तपास; आरोपी लवकरच गजाआड”
पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांचा इशारा
या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात BNS 2023 चे कलम 303(2), 324(4) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रभारी पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,
“परिसरातील सीसीटीव्ही अर्थात तिसऱ्या डोळ्याच्या सहाय्याने सखोल तपास सुरू असून, आरोपी चोरास लवकरच गजाआड करण्यात येईल.”
त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ चव्हाण पुढील तपास करत असून, शहरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी सुरू आहे.

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button