Letest News
शिर्डीत रिक्षातून वृद्धाची लूट सराईत गुन्हेगार रहीम पठाणसह दोघांना २ दिवसांची पोलीस कोठडी समता घोटाळा : व्यवस्थापकाला पोलीस कोठडी आता 'मोठ्या माश्या'वर कारवाई कधी? शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा
राजकीयशिर्डी

नवीन वर्षाची सुरुवात साईचरणी! केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चौहान सहपरिवार शिर्डीत

शिर्डी (साई दर्शन न्यूज) – नवीन वर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण देशात उत्साह असताना, मा. ना. श्री. शिवराजसिंग चौहान, केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री तसेच ग्रामीण विकास मंत्री, भारत सरकार यांनी सहपरिवार श्री क्षेत्र शिर्डी येथे येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले.
श्री साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी नवीन वर्षाची सुरुवात भक्तिभावाने केली. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व श्री साईबाबांची प्रतिमा देऊन सन्मानपूर्वक सत्कार केला.
मा. ना. श्री. शिवराजसिंग चौहान हे निस्सीम साईभक्त असून, ते दरवर्षी ३१ डिसेंबर रोजी शिर्डीत येऊन नवीन वर्षाची सुरुवात श्री साईबाबांच्या चरणी करण्याची परंपरा जपतात. अनेक वर्षांपासून अखंड सुरू असलेली ही श्रद्धेची परंपरा भाविकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शिर्डीत साईभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून, संपूर्ण परिसर ‘साईनामाच्या गजराने’ दुमदुमून गेला आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या साईदर्शनामुळे मंदिर परिसरात उपस्थित भाविकांमध्ये विशेष उत्साह व भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले.
श्री साईबाबांच्या कृपेने देशातील शेतकरी, ग्रामीण विकास व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी अधिक प्रेरणा मिळाल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्याचेही सांगण्यात आले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button