कोपरगाव | प्रतिनिधी :
कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली असून, दिवसभरात मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. विशेषतः शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र झावरे व शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या बाजूने मतदारांचा स्पष्ट कल दिसून येत होता. सकाळपासूनच अनेक मतदान केंद्रांवर शिवसेना समर्थकांची गर्दी लक्षणीय होती.
शिवसेना कार्यकर्त्यांत जोश, ‘राजेंद्र झावरे’ नावाचा गजर
मतदानाच्या दिवशी शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. “विकास, स्वच्छता आणि मजबूत नेतृत्व” या मुद्द्यांवर मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला. अनेक प्रभागांमध्ये राजेंद्र झावरे यांच्या नावाचा गजर, तसेच शिवसेनेच्या चिन्हाला पसंती मिळत असल्याचे चित्र दिसून आले.
एकनाथ शिंदे यांच्या सभेचा मतदानावर थेट प्रभाव
काल झालेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते मा. ना. एकनाथ शिंदे साहेब यांच्या जंगी सभेचा थेट परिणाम मतदानावर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या सभेमुळे शिवसेनेच्या प्रचाराला जबरदस्त बळ मिळाले असून, संभ्रमात असलेले अनेक मतदार शिवसेनेकडे वळल्याचे स्थानिक पातळीवर बोलले जात आहे.
विरोधक गारद? निकालाकडे सर्वांचे लक्ष
मतदानानंतर कोपरगावच्या राजकीय वातावरणात मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, शिवसेना समर्थकांमध्ये आत्मविश्वास दिसून येत आहे. “यावेळी कोपरगावमध्ये शिवसेनेचा झेंडा फडकणार” असा दावा कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
आता सर्वांचे लक्ष मतमोजणी आणि अंतिम निकालाकडे लागले असून, कोपरगावच्या सत्तेचा किल्ला कोणाच्या हाती जाणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
DN SPORTS

