Letest News
साईसेवेतील प्रामाणिकपणाचा उज्ज्वल आदर्श! पहारेकरी यांची कर्तव्यनिष्ठा ठरली प्रेरणादायी भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा स्फोट! अटकेपूर्वी शिर्डीत गुप्त बैठक-तीन आयएएस अधिकाऱ्यांवर संशय रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा
अ.नगरशिर्डी

“शिर्डीतील सोन्यापेक्षा मोलाचा प्रामाणिकपणा कर्मचाऱ्याने सापडलेली अंगठी कार्यालयात जमा साई सेवकाचा खरा आदर्श!

शिर्डी (प्रतिनिधी):
साईबाबांची कृपा लाभलेल्या शिर्डी धामात 10 डिसेंबर 2025 रोजी एक प्रेरणादायी घटना घडली. साई आश्रम भक्तनिवास येथे काम करणारे, आरोग्य विभागातील आउटसोर्स कर्मचारी श्री. किशोर वाल्मिक जगताप यांनी अपार प्रामाणिकतेचे उदाहरण घालून दिले आहे.

sai nirman
जाहिरात

साफसफाईचे नियमित काम सुरू असताना इमारतीजवळ त्यांना एक सोन्याची अंगठी आढळली. साधारण काम करणाऱ्या, तुटपुंज्या पगारावर दिवस काढणाऱ्या या कर्मचाऱ्याने कोणताही मोह न बाळगता ती अंगठी थेट संरक्षण कार्यालयात जमा केली.

जमा करण्यात आलेल्या अंगठीचे तपशील—

DN SPORTS

वजन : 1.460 मिलिग्रॅम

अंदाजे किंमत : ₹15,476/-

ही अंगठी कोणत्या भक्ताची हरवली हे अद्याप स्पष्ट नसले तरी, कर्मचाऱ्याने दाखवलेला प्रामाणिकपणा, निष्ठा आणि साईबाबांच्या सेवेला दिलेले परम महत्त्व संपूर्ण संस्थानासाठी प्रेरणादायी ठरले आहे.


संस्थानचे अधिकारीदेखील प्रभावित – विशेष अभिनंदन

या घटनानंतर साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी श्री. जगताप यांना बोलावून त्यांच्या प्रामाणिकतेचे कौतुक केले.
संस्थान प्रशासनाचे म्हणणे—

kamlakar

“कमीत कमी वेतनावर काम करणारा कर्मचारी एवढा मोठा प्रामाणिकपणा दाखवतो, हे साईबाबांच्या संस्कारांचे प्रत्यक्ष दर्शन आहे. संस्थानला अशा कर्मचाऱ्यांचा अभिमान आहे.”


भक्त आणि नागरिकांमधून कौतुकाची लाट

शिर्डीत आलेल्या भक्तांनीही या घटनेचे स्वागत केले.
– “साईबाबा संस्थानात अद्यापही असे कर्मचाऱ्यांचे संस्कार जिवंत आहेत, हे समाधान देणारे आहे,” असे अनेक भक्तांनी सांगितले.

– “दिवसभर गलिच्छ वातावरणात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची ईमानदारी हे समाजासाठी खरे उदाहरण आहे,” असे स्थानिकांनी प्रतिक्रिया दिली.


प्रामाणिकतेचा महत्वाचा संदेश

या घटनेतून सर्व कर्मचाऱ्यांना तसेच शिर्डीला भेट देणाऱ्या लाखो भक्तांना एक संदेश मिळतो—
“साईची सेवा म्हणजे केवळ काम नाही, तर साईबाबांच्या शिकवणीला जगण्याची संधी आहे.”


जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button