Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
अ.नगरराजकीय

कोपरगावात निष्ठावंत कडवट शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद-भरत मोरे यांचा भावनिक संदेश चर्चेत

कोपरगाव —
निष्ठावंत कडवट शिवसैनिकांना सप्रेम जय महाराष्ट्र देत शिवसेनेचे स्थानिक नेते भरत मोरे यांनी कोपरगावकरांसाठी भावनिक संदेश जारी केला आहे. तब्बल ३० वर्षांच्या निष्ठेबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पत्नीला ‘मशाल’ चिन्हावर उमेदवारी देऊन दाखवलेल्या विश्वासाबद्दल भरत मोरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

sai nirman
जाहिरात

मोरे म्हणाले की, “लहानपणापासून मी शिवसैनिकांच्या सहवासात जनसेवा करत आलो. ठाकरेंची शिवसेना सोडण्याचा विचार कधी मनातही आला नाही. तडीपारी, पोलीस केस, आर्थिक नुकसान—काहीही झालं तरी निष्ठा ढळली नाही.”

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पुन्हा जेष्ठ निष्ठावंत शिवसैनिकांना भेटण्याचा योग आला. शहरातील नागरिकांचा आणि शिवसैनिकांचा उत्साह पाहून त्यांना मोठा आत्मविश्वास मिळाल्याचे ते म्हणाले.

DN SPORTS

मोरे म्हणाले, “हे माझं श्रेय नाही. हे श्रेय हजारो निष्ठावंत कडवट शिवसैनिकांचे आहे. कोपरगावच्या प्रत्येक घरात ठाकरे कुटुंबाबद्दल प्रेम आणि श्रद्धा आहे.”

येत्या काळात या सर्व शिवसैनिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने संघर्ष करत राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले. कोपरगावच्या विकासासाठी आणि शिवसेना बळकटीसाठी स्वतःचे सर्वस्व अर्पण करण्याची प्रतिज्ञाही त्यांनी केली.

मोरे पुढे म्हणाले,
“भ्रष्टाचार कणभरही करणार नाही किंवा होऊ देणार नाही. ही माझ्या स्वर्गवासी आईची शपथ आहे. कोपरगावची मातृभूमी, मायमाऊलींचे प्रश्न आणि लोकहिताचा स्वराज्य मार्गी लावण्यासाठी आज मला निष्ठावंत शिवसैनिकांची गरज आहे.”

शेवटी कोपरगावकरांना केलेल्या भावनिक आवाहनात ते म्हणतात,
“तुमचे मत गोदामाईच्या साक्षीने सांगतो — वाया जाणार नाही. भरत मोरे यांना नगराध्यक्ष म्हणून निवडून देण्याची विनंती करतो.”

kamlakar

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button