Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
क्राईमशिर्डी

शिर्डी क्राईम अलर्ट! – साईभक्त महिलेला दिवसाढवळ्या सोन्याची लूट-प्रशासन कधी जागे होणार?

शिर्डी | 
साईनगरीत गुन्हेगारांचे साम्राज्य वाढतच चालले आहे. भाविकांची सुरक्षितता रामभरोसे झाल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. दर्शनासाठी आलेल्या बेंगळुरू येथील पर्यटक महिलेला दोन मोटरसायकलवरील इसमांनी 2 लाखांचा सोन्याचा दागिना हिसकावून फरार होत प्रशासनाला पुन्हा एकदा खुले चॅलेंज दिले आहे. 

sai nirman
जाहिरात

—

📌

 कशी झाली चोरी? 

DN SPORTS

फिर्यादी के. एम. सुमित्रा (वय 59) या आपल्या कुटुंबासह शिर्डीत दर्शनासाठी आल्या होत्या.

रात्री 9.20 वाजता, भक्तनिवासाकडे पायी जात असताना बंधन हॉटेल–श्रवण भवन या दरम्यानच्या रस्त्यावर

काळे मास्क व काळी जॅकेट घातलेल्या दोन हल्लेखोरांनी पल्सरवरून येत

महिलेच्या गळ्यातील 40 ग्रॅम सोन्याची चैन आणि 10 ग्रॅम पेंडंट असलेले मंगळसूत्र क्षणात हिसकावले

आणि कोपरगावच्या दिशेने निसटले.

kamlakar

ही घटना घडली त्यावेळी परिसरात ना गस्त, ना सुरक्षा, ना पोलीसांची कोणतीही उपस्थिती!

—

📌

 शिर्डी पुन्हा असुरक्षित – भावना वाढतच!

जगभरातून येणाऱ्या भाविकांचे शहर म्हणून ओळख असणाऱ्या शिर्डीत
साखळी चोरी, स्नॅचिंग, पर्यटनस्थळांवरील छेडछाड आणि गुन्हेगारी वाढत आहे.

—

📌

 प्रशासन कधी जागे होणार?

भाविकांना सुरक्षा देणे कोणी पाहणार?

CCTV वॉचिंग कोठे गायब आहे?

गस्त पथक कुठे असते?

रोजच्या वाढत्या चोरींनंतरही उपाययोजना कुठे आहेत?

गुन्हेगार बिनधास्त…
पर्यटक घाबरलेले…
आणि प्रशासन मात्र गाढ झोपेत!

—

📌

 पोलीसांची कारवाई

शिर्डी पोलिसांनी FIR क्रमांक 1011/2025 अंतर्गत BNS कलम 309(4) नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
विशेष पथक तयार करण्यात आले असून, CCTV फूटेज तपासले जात आहे.

ह्या प्रकरणी घटनेच्या ठिकाणचे सीसीटीव्ही तपासून आरोपीना लवकरच गजाआड करू पोलीस निरीक्षक रणजित गलांडे 

—

➡️

 साईदर्शन न्यूज कडून प्रश्न –
भाविकांची राजधानी असलेल्या शिर्डीत सुरक्षितता हा लक्झरी का झाला आहे?

अजून अपडेट्ससाठी जोडलेले राहा.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button