Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
राजकीयशिर्डी

प्रभाग 5 मध्ये जागृत मतदारांचा संताप उफाळला – … फक्त आमची मीराताईच!”

साईबाबांच्या नगरीतील प्रभाग क्रमांक 5 मध्ये अनेक वर्षांपासून बाहेरील उमेदवारांना संधी मिळत आली.
पण त्याचा प्रभागाला काय फायदा झाला?
विकास तर झाला नाहीच… उलट प्रभागाची बदनामीदेखील रोखता आली नाही, अशी संतप्त भावना आता घराघरातून व्यक्त होत आहे.

sai nirman
जाहिरात

प्रभागातील नागरिकांच्या मनात एकच प्रश्न धगधगत होता –
“आमच्या प्रभागाची दुर्दशा कोणी थांबवणार?”

या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर मतदारांनी यंदा स्पष्ट निर्णय घेतला—

DN SPORTS

**“ह्या प्रभागावर लागलेला ‘कालिका नगर’ चा डाग पुसायचा असेल…

तर ते काम फक्त आमच्या मीराताईच करू शकतात!”**

याच विश्वासाने मीराताई यांना उमेदवारी करावी लागली.
ही उमेदवारी त्यांची महत्वाकांक्षा नसून,
प्रभागातील मतदारांच्या वेदनेचा आवाज आणि त्यांच्या आग्रहाचा आदर आहे.


मीराताईंचा कडक शब्दांत इशारा – “सहा महिन्यात प्रभागाचा चेहरा बदलून दाखवेन”

मीराताई म्हणाल्या :

kamlakar

“मतदारांनी मला दाखवलेला विश्वास माझ्यासाठी आदेश आहे.
मी प्रभागाचा चेहरा–मोहरा बदलून दाखवेन.
जर सहा महिन्यात काम दिसले नाही…
तर मी स्वतःहून पदाचा राजीनामा देईन.
विश्वासाला तडा जाऊ देणार नाही – ही मीराताईची हमी आहे.”

त्यांच्या या भूमिकेमुळे प्रभागात नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
निवडून आलेल्या प्रतिनिधींनी वर्षानुवर्षे टाळलेली कामे
मीराताई हातात घेताच पूर्ण होतील, अशी खात्री मतदार व्यक्त करत आहेत.


मतदारांचा संताप आणि बदलाची हाक

प्रभागातील मतदार सरळपणे म्हणू लागले आहेत :

“खूप वर्ष सहन केलं… आता नाही!”

“ह्या वेळेस बदल अटळ आहे.”

“बाहेरचा उमेदवार नको… आमचीच मीराताई हवी!”

जागृत मतदारांचे हे स्पष्ट मत पाहता
प्रभाग 5 मध्ये भूकंपाच्या धक्क्यासारखा परिवर्तनाचा आवाज ऐकू येत आहे.


परिणाम स्पष्ट – प्रभागात ‘परिवर्तनाची लाट’

मीराताईंच्या उमेदवारीनंतर प्रभागात आशा निर्माण झाली आहे.
अनेक वर्षांची उपेक्षा, दुर्लक्ष आणि त्रास
याला उत्तर म्हणून मतदार एकत्रित झाले आहेत.

ही निवडणूक
विकास विरुद्ध उपेक्षा
स्थानिक नेतृत्व विरुद्ध बाहेरचा उमेदवार
अशी ठरू लागली आहे…

आणि त्या लढाईत आज मतदार स्पष्ट सांगत आहेत—

“आमचं नेतृत्व – आमची मीराताई!”

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button