Letest News
पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ समता पतसंस्थेच्या घोटाळ्यात ED ची मोठी एन्ट्री-अशोक खरातच्या लॉकरमधून कोट्यवधींचं घबाड “साईप्रसाद की भ्रष्टाचार?” प्रसादालयातील खरेदीवर गंभीर प्रश्नचिन्ह शिर्डीत फसवणुकीचा नवा डाव! गजराच्या नावाखाली भाविकांची लूट लोणीत गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश- आणखी १ डॉक्टरसह २ एजंट जाळ्यात निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद
राजकीयशिर्डी

प्रभाग ५ मध्ये “मीराताई साना वादळ” — समोरच्या उमेदवारांना झोप उडवणारा जनसमर्थनाचा स्फोट

शिर्डी :
प्रभाग क्रमांक ५ मध्ये निवडणुकीचे वातावरण अक्षरशः धगधगत आहे.
स्वाभिमानी शिर्डी आघाडीच्या उमेदवार मीराताई साना यांच्या प्रचाराचे एवढे जोरदार वातावरण निर्माण झाले आहे की, समोरचे उमेदवार उघड रस्त्यात फिरायलाही घाबरत आहेत, अशी चर्चा मतदारांत खुलेपणाने होत आहे.

sai nirman
जाहिरात

जेष्ठ नेते बाबूजी पुरोहित आणि तरुण नेतृत्व वीराट पुरोहित यांचं सामर्थ्य पाठीशी मिळाल्यानंतर मीराताईंची मोहिम आता हुकमी खेळी ठरत आहे.


“मी लढले, पळाले नाही… झुकले नाही” — मीराताईंचा थेट समोरच्यांवर प्रहार

DN SPORTS

आजच्या सभेत मीराताईंनी बिनधास्त, कडक आणि निडर शब्दात घोषणा केली :

“मला हारजीतची भीती नाही. मी पळाले नाही, झुकले नाही… आणि या प्रभागाच्या भविष्यासाठी अजूनही मागे हटणार नाही.”

हे वाक्य म्हणजे समोरच्या उमेदवारांना थेट आव्हान होते.
कारण —
समोरचे उमेदवार मागच्या दाराने राजकारण करतात, मीराताई तोंडावर बोलतात.


समोरच्या उमेदवारांच्या ‘डरपोक’ कारभारावर जनतेचा रोष — मीराताईंचा सर्जिकल स्ट्राइक

१५ वर्षे प्रभागात सत्ता हवी, पण जबाबदारी नाही —
यावर मीराताईंचा निशाणा अगदी धारदार होता.

kamlakar

त्या म्हणाल्या :

“प्रभागाच्या रस्त्यांवर गुन्हेगार मोकाट आणि काही जण मात्र फक्त पोस्टरांवर नेता!
अशा लोकांच्या हातात प्रभागाचा भविष्य कधीच सुरक्षित राहू शकत नाही.”

हे विधान थेट समोरच्या “कागदी वाघां”वर घणाघात होता.


“कालिका नगरला ग्रँट रोड बनवणारे कोणताही बापाचा लेक असूदे… मी उभी आहे!”

मीराताईंचे कडक विधान सभेत ऐकू येताच गर्दीतून क्षणात टाळ्या आणि नारेबाजी उसळली.

त्यांनी ठामपणे सांगितले :

“मी कुठल्याही परिस्थितीत प्रभागाला ग्रँट रोडसारखा गुन्हेगारीचा अड्डा होऊ देणार नाही.
माझा प्रभाग निडर, सुरक्षित आणि शांततेत जगणारा असला पाहिजे… आणि त्यासाठी मी एकटी पुरेशी आहे.”

समोरच्या उमेदवारांवर हा थेट वज्रप्रहार म्हणून पाहिला जात आहे.


**“पैसा घेऊन मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न?

घ्या हो पैसा… मतदान लेकीलाच द्या!”**

मीराताईंची ही लाइन आजच्या सभेची स्टार बनली :

“मी गरीब आहे… पैशाने स्पर्धा करू शकत नाही.
पण प्रभागाला सुरक्षा, आत्मविश्वास आणि न्याय देऊ शकते.
पैसा त्यांचा घ्या—
पण मतदान या मातीत वाढलेल्या आपल्या लेकीलाच द्या!”

जनता अक्षरशः थरारली.


६ महिन्यांत बदलाची हमी — समोरचे उमेदवार ६ वर्षांतही केले नाही ते दाखवणार

मीराताई म्हणाल्या :

“मी निवडून आले तर ६ महिन्यात प्रभाग बदलेल.
ज्यांनी ६ वर्षांत काही केले नाही, त्यांना आता चेहरा दाखवायलाही जागा राहणार नाही.”

हा समोरच्यांच्या निष्क्रिय कारभारावर स्पष्ट कट्यार.


“मी पहिली स्त्री नाही जी उभी राहिली… पण मी पहिली आहे जी लढते आहे!”

मीराताईंच्या या वाक्याने सभेत भावनांचा स्फोट झाला :

“माझी लढाई कोणाविरुद्ध नाही…
माझी लढाई माझ्या प्रभागाच्या भविष्याविरुद्ध खेळणाऱ्यांविरुद्ध आहे!”


**मतदारांना थेट आवाहन — “प्रभाग ५ चा इतिहास बदला…

एकत्र या आणि स्वाभिमानी शिर्डी आघाडीला विजयी करा.”**

सभेचा शेवट दमदार शब्दांत झाला :

“आपली लेक मीरा साना आणि स्वाभिमानी शिर्डी आघाडीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा.
प्रभाग भयमुक्त व्हायला हवा… आणि हे काम आपण मिळून करू.”

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button