शिर्डी नगरपरिषद निवडणुकीचा सविस्तर आढावा
(प्रतिनिधी – शिर्डी)

शिर्डी नगरपरिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात आज शिर्डीत पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणुकीची संपूर्ण माहिती देत सांगितले की, आगामी २ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान पार पडणार असून ३ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून मोजणीला सुरुवात होणार आहे. मोजणीचे ठिकाण श्री साईबाबा संस्थानची ITI इमारत (५०० रूम) असेल. अंदाजे दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर होतील.
🔹 एकूण मतदारसंख्या
शिर्डी नगरपरिषद क्षेत्रात एकूण ३३,६१३ मतदार असून त्यामध्ये
पुरुष मतदार – १६,७९२
महिला मतदार – १६,८१६
🔹 प्रभागनिहाय मतदारसंख्या
1️⃣ प्रभाग क्र. १ – ३५७७
2️⃣ प्रभाग क्र. २ – ३१६३
3️⃣ प्रभाग क्र. ३ – २८५०
4️⃣ प्रभाग क्र. ४ – २६६६
5️⃣ प्रभाग क्र. ५ – २६२७
6️⃣ प्रभाग क्र. ६ – १६७८
7️⃣ प्रभाग क्र. ७ – २१३२
8️⃣ प्रभाग क्र. ८ – ३३५९
9️⃣ प्रभाग क्र. ९ – ३१८४
🔟 प्रभाग क्र. १० – २४१६
1️⃣1️⃣ प्रभाग क्र. ११ – ५९६१
🔹 मतदान केंद्रांची मांडणी
एकूण ४ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
प्रभाग १ ते ३ : जिल्हा परिषद शाळा, पिंपळवाडी रोड, शिर्डी
प्रभाग ४, ५ व ६ : आदर्श विद्यालय, सिटी मार्केट जवळ
प्रभाग ७ व ११ : साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूल (५०० रूम)
प्रभाग ८, ९ व १० : साईनाथ माध्यमिक शाळा, एअरपोर्ट रोड
🔹 EVM मशीनचे वाटप
प्रभागानुसार ईव्हीएम मशीनचे वाटप खालीलप्रमाणे आहे :
1️⃣ प्रभाग १ – ४ मशीन
2️⃣ प्रभाग २ – ३ मशीन
3️⃣ प्रभाग ३ – ३ मशीन
4️⃣ प्रभाग ४ – ३ मशीन
5️⃣ प्रभाग ५ – ३ मशीन
6️⃣ प्रभाग ६ – २ मशीन
7️⃣ प्रभाग ७ – २ मशीन
8️⃣ प्रभाग ८ – ४ मशीन
9️⃣ प्रभाग ९ – ३ मशीन
🔟 प्रभाग १० – ३ मशीन
1️⃣1️⃣ प्रभाग ११ – ७ मशीन
🔹 निवडणूक अधिकारींची माहिती
पत्रकार परिषदेत निवडणूक अधिकारी यांनी सांगितले की, मतदान शांततेत, पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांची तयारी पूर्ण झाली आहे. मतदारांना आवश्यक सुविधा पुरविण्यात येणार असून पोलिस विभागाकडून सुरक्षेचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे.
नगरपरिषद क्षेत्रात यावेळी निवडणुकीबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली असून सर्व प्रभागांमध्ये चुरशीची लढत अपेक्षित आहे.
