Letest News
राहता शहरात गुटख्याचा काळाबाजार तेजीत-सोहेल-अनिकेतच्या कथित गुटखा विक्रीला कोणाचा वरदहस्त? सुजय विखे पाटील यांचे कट्टर समर्थक राहुल शिंदे यांचा निलेश लंकेंकडून पराभव! हजारो लेकींच्या डोक्यावर मायेचा हात ठेवणाऱ्या सुमित्रा काकी काळाच्या पडद्याआड शिर्डीच्या सामाजिक राज... दररोज ५०० रुपये द्या तरच दुकान चालवू देऊ!’ माजी नगरसेवकासह पाच जणांवर गुन्हा शिर्डीच्या अनाधिकृत बियर बार मध्ये मोठी धाडसात लाखाचे मध्यप्रदेशातिल दारू जप्त चेअरमन विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखाली साई संस्थान कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! दिवाळीनिमित्त शिधा व म... पैशांचा मोह नाही- कर्तव्याशी इमान! साई संस्थानच्या कर्मचाऱ्याचे कौतुक पादुका दर्शन सोहळ्यामुळे शिर्डीच्या दसरा-पुण्यतिथी उत्सवाला ग्रहण?अ‍ॅड. गोकुळ ठुबे यांची चौकशीची माग... प्रारंभ राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी भरती सुरू-पदवीधर तरुणांना रोजगाराची संधी! दहीहंडी फोडून श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता!
अ.नगरशिर्डी

शिर्डीत श्री साईबाबा समाधी मंदिरात दिपावली श्री लक्ष्मीपूजन कार्यक्रम

शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दिपावली निमित्त श्री लक्ष्मीपूजनाचा पवित्र सोहळा मंगलमय वातावरणात मोठ्या भक्तिभावाने पार पडणार आहे. श्री साईबाबा संस्थानच्यावतीने हा पारंपरिक पूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, भाविकांना या दिव्य सोहळ्याचे दर्शन घेता यावे यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

sai nirman
जाहिरात

कार्यक्रमानुसार —
🗓 दिनांक : २१ ऑक्टोबर २०२५ (मंगळवार)
🕟 सायंकाळी ०४.३० वाजता श्री साईबाबा समाधी मंदिरातील दर्शन बंद करण्यात येईल.
🕠 सायंकाळी ०४.३० ते ०५.०० वाजेपर्यंत श्री लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक तयारी केली जाईल.
🕔 सायंकाळी ०५.०० ते ०५.५५ वाजेपर्यंत श्री साईबाबा समाधी मंदिरात अत्यंत भक्तिभावाने श्री लक्ष्मीपूजन विधी संपन्न होईल.
🕕 सायंकाळी ०६.०० वाजता श्रींची पारंपरिक धुपारती सुरू होईल.

या पवित्र प्रसंगी मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई, सुवासिक फुलांची सजावट आणि दिव्यांचा झगमगाट यामुळे संपूर्ण समाधी मंदिर परिसर दैवी तेजाने उजळून निघणार आहे.

DN SPORTS

मंदिर प्रमुख यांनी सांगितले की,

“दिपावलीचा हा शुभदिन श्री साईबाबांच्या कृपाशिर्वादाने भाविकांसाठी आनंद, समृद्धी आणि सौभाग्य घेऊन येवो, अशी मनोकामना आहे. पूजनावेळी भाविकांनी शांतता, शिस्त आणि भक्तिभाव राखावा अशी विनंती करण्यात येते.”

श्री साईबाबांच्या चरणी भाविकांनी दीप अर्पण करून आणि श्रींच्या आरतीत सहभागी होऊन आपले मनोभाव व्यक्त करावेत, असे आवाहन संस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button