Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
अ.नगरराजकीय

ओढे-नाल्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम – पालकमंत्री राधाकृष्ण विखे

शिर्डी, (प्रतिनिधी) –

sai nirman
जाहिरात

जिल्ह्यातील ओढे-नाले, चाऱ्या, तलाव, कालवे, बंधारे, रस्ते व पूल यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. यामुळे पाण्याला अटकाव होऊन पूरपरिस्थिती निर्माण होते. हे अतिक्रमण तात्काळ काढण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.


पालकमंत्र्यांच्या तातडीच्या बैठकीत उपाययोजना ठरवल्या

DN SPORTS

अहिल्यानगर जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथे पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी तातडीची बैठक घेतली. यावेळी उपस्थित होते:

साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर

अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर

उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती

जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंते बाळासाहेब शेट्ये, सोनल शहाणे, सायली पाटील, प्रदीप हापसे, स्वप्निल काळे

kamlakar

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे

तहसीलदार, कृषी अधिकारी आणि इतर संबंधित अधिकारी

पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले की, जलसंपदा व जलसंधारण विभागाने जिल्ह्यातील पाणीसाठ्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी समन्वयातून कृती आराखडा तयार करावा. ओढे-नाले व चराई क्षेत्रांची व्यवस्थित मोजमाप करून अतिक्रमण हटविण्यात यावे.


अतिवृष्टीमुळे प्रभावित क्षेत्र आणि प्रशासनाचे उपाय

पाथर्डी व शेवगाव तालुक्यात मिळून अंदाजे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित

जामखेड तालुक्यात ६० हेक्टर, राहाता तालुक्यात अंदाजे ४० हजार हेक्टर क्षेत्र प्रभावित

प्रशासन सतर्क असल्यामुळे मनुष्यहानी कमी; हजारो लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यश

जिल्हा परिषद शाळा, आश्रमशाळा, साई आश्रम अशा ठिकाणी तात्पुरते निवारा

स्वयंसेवी संस्था व स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून पुरग्रस्तांना सुविधा उपलब्ध

पुरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या सुविधांवर प्रशासनाने लक्ष ठेवावे

पालकमंत्री म्हणाले की, शिर्डीत २०२० व २०२२ मधील अतिवृष्टींपासून धडा घेत, मोठ्या प्रमाणात नागरी सुविधा उपलब्ध झाल्यामुळे कालच्या पावसात नुकसान कमी झाले. नगरपालिका प्रशासनाने तत्परतेने मदतकार्य राबविले.


सुरक्षा आणि अतिरिक्त उपाययोजना

शिर्डी–लोणी महामार्गावरील बसस्थानकाजवळील गतीरोधक तात्काळ हटवावे

महावितरणच्या वीज वितरण पेट्या पाण्यात गेल्या तरी वीजपुरवठा खंडित केला नाही

ट्रान्सफॉर्मर पाण्याच्या प्रवाहात असल्यास तात्काळ वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही

कृषी व महसूल विभागाने सरसकट पंचनामे करावेत

आरोग्यविषयक उपाययोजनांचा आढावा

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button