Letest News
राजकीय हस्तक्षेपामुळे झाली शिर्डी पोलिस यंत्रणा हतबल ?  अशा कारणांनेच वाढते आहे शिर्डीत गुन्हेगारांच... शिर्डीत दडिहंडीच्या दिवशी लागला गालबोट तिघांनी एकावर चाकूने वार करून संपवले  सिनेअभिनेत्री कंगना राणावत यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले त्या महिलेचा खून तिच्याच पतीने केले पोलीसांनी चक्रे फिरवून पतिला घेतले ताब्यात श्री साईबाबांबद्दल चुकीच्या अफ़वा व आर्थिक फसवणूकी सह विविध विषयांवर धोरण व यंत्रणा राबवावी श्री साई निर्माण शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी अनोख्या उपक्रमातून साजरी केली ' रक्षाबंधन ' भाजपाचे माजी जिल्हा पदाधिकारी बंडू शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा महिला विनयभंगाचा गंभीर गुन्हा दाखल मुख्यमंत्री सहाय्यता निधी अनेक रुग्णांसाठी ठरला आशेचा किरण ! लाभार्थी रुग्णांनी व्यक्त केल्या कृतज्ञ... नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे अहिल्यानगर येथे उत्साहात स्वागत ! रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल येथे कै पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांची 125 जयंती व शे...
क्राईमशिर्डी

राजकीय हस्तक्षेपामुळे झाली शिर्डी पोलिस यंत्रणा हतबल ?  अशा कारणांनेच वाढते आहे शिर्डीत गुन्हेगारांचे मनोबल !!

शिर्डी प्रतिनिधी /
शिर्डी हि साईचा चरणस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे याच शिर्डी मध्ये खुन खुनाचा प्रयत्न पाकीटमारी धुमस्टाईल चोरी नशेचे साहित्य विकणारे भाईगिरी राजाश्रय मिळवत त्या पाठबळावर चोर पावलांनी वाढलेली गुन्हेगारी हतबल पोलीस करतील मला काय करायचे हि काहीं मंडळींची भुमिका शिर्डीत गुन्हेगारी वाढवण्यासाठी कारण ठरत

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

असुन राज्यात दबदबा असलेले कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री व गृहराज्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी आता कठोर भूमिका घेण्याची गरज निर्माण झाल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांमधून पुढे येत आहे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी देखील मौन सोडून प्रयत्न करण्याची गरज आहे


देशविदेशातून लाखो साईभक्त साईबाबांवर श्रद्धा ठेऊन नतमस्तक होतात परंतु ह्याचा शिर्डीला गुन्हेगारी अवैद्य व्यवसायाचे ग्रहण लागलेले आहे असं वाटायला लागले आहे शिर्डीत दोन संस्थानाचे निष्पाप कर्मचारी यांची हत्या करण्यात आली एकजण जखमी झाला दोन कुटंब उध्वस्त झाले कोणाचा मुलगा गेला कोणाचा पती तर निष्पाप मुला मुलींचे वडील या घटनेत बळी ठरले

आर्थिक मदतही मिळाली पण गेलेला माणूस परत येऊ शकतो का याची आत्मचिंतन कोणी करणार आहे की नाही अनेक लोकांवर हल्ले करण्यात आले त्यानंतर झोपी गेलेल्या पोलीस प्रशासनाला जाग आली आणि तत्कालीन अकार्यक्षम पोलीस अधीक्षक ओला यांनी स्वताच्या चुकीचे खापर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचावर फोडून त्यांचा बळी देऊन त्यांची तात्काळ बदली केली

वास्तविक पाहाता कमी मनुष्यबळ व्हि आय पी मंडळीचा बंदोबस्त राजकीय हस्तक्षेप यात कुंभार यांचा दोष नव्हता जाताना दिलेली प्रतिक्रिया व मनाचा शल्य बरेच काही सांगून जात होती त्यास शिर्डी मधुन बदलून गेलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याची जणू काही अप्रत्यक्ष असलेली प्रतिक्रिया व काम करण्याची इच्छा असूनही काम करता येत नसल्याने दुसरीकडे बरे होते अशीच धारणा होऊन जाते

शिर्डीत गुन्हेगारी वाढण्याला पोलीस अधीक्षक राकेश ओला हेच कारणीभूत होते त्यांनी जर शिर्डीसह उत्तर नगर जिल्ह्यात गुन्हेगारी व अवैद्य व्यवसायांकडे बारिक लक्ष दिल असते तर या घटना घडल्या नसत्या परंतु राकेश ओला यांनी शिर्डीकडे कधीच गंभीरपणे बघितले नाही संस्थान कर्मचारी यांच्या हत्या झाल्यानंतर शिर्डी पोलीस स्टेशनचा कारभार पोलीस निरीक्षक तरुण तडफदार अनुभवी काम करण्याची

इच्छाशक्ती प्रचंड जनसंपर्क गुन्हेगारांची बारीक सारीक माहिती असलेल्या पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी चार्ज घेतला रणजित गलांडे हे शांत व सय्यमी वेळेवर झोप नाही तरीही साईंच्या समाधीच्या साक्षीने त्यांनी संकल्प केला काही महिन्यात गुन्हेगारीचा आलेख कमी झाला शिर्डी गावावर नियंत्रण मिळविले परंतु शिर्डीत कामाचा व्याप जास्त आणि यंत्रणा कमी असल्याने गुन्हेगारांनी व अवैद्य व्यवसायाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली

आणि पुन्हा एकदा शिर्डीत गुन्हेगारी वाढली अवैद्य व्यवसाय राजरोसपणे सुरु झालेत ह्या सर्व गोष्टी फक्त पोलिसांच्या भरवश्यावर अवलंबून राहणे आणि आपण काहीच न करणे हेही गुन्हेगारी आणि अवैद्य व्यास वाढण्याचे महत्त्वाचे कारण आहे त्यासाठी शिर्डी ग्रामस्थांनी देखील यासाठी पाउल उचलणे महत्वाचे आहे वाढलेले रस्त्यावरची अतिक्रमण नगर मनमाड वर उभी राहणारी लहान मोठी वाहने साई भक्तांना सहजपणे न करता येणारा पाई प्रवास लहान मोठ्या अतिक्रमणावर कारवाई करताना मोठ्यांकडे

होणारे दुर्लक्ष बघत असणारी हातबल जनता याचा फायदा देखील काही गुन्हेगार घेत आहेत . ठराव न घेता प्रत्येक्षात अंमलबजावणी करणे महत्वाचे आहे आता पुन्हा गुन्हेगारांच्या व अवैद्य व्यवसाय करणाऱ्यांच्या नांग्या ठेचण्याची वेळ आलेली आहे पोलिसांना ग्रामस्थांची साथ मिळाली तर हे करणे अशक्य नाही त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे पोलिसांनी रात्री ११ वाजता सर्व व्यवसाय बंद केले पाहिजेत पोलीसगस्त वाढवली गेली पाहिजे

ग्रामसुरक्षा दलाची नियुक्ती केली पाहिजे जेणे करून शिर्डीचे पावित्र्य अबाधित राहील यासाठी सवांनी एकादिलाने काम करणे गरजेचे आहे अन्यथा एकमेकांवर ढकलण्यात जाणारा वेळ खून करणारे तरुण बळी पडणारा तरुण नशेतील तरुणाई उध्वस्त होणारे कुटुंब हे रोखणे फक्त पोलिसांचे काम नव्हेतर

शिर्डी सह पंचक्रोशीची सामूहिक जबाबदारी आहे त्याच्यासाठी राजकीय इच्छाशक्ती सामूहिक संघटन जनतेची खंबीर साथ व पोलिसांना पाठबळ व पोलिसांमध्ये राजकीय हस्तक्षेप थांबला तर सहजपणे ही होऊ शकते मात्र त्यासाठी हवी इच्छाशक्ती इतकेच म्हणता येईल

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button