शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त आणि सध्याचे उप कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी राहत्या घरी छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. नितीन शेटे यांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असून, त्यांच्या आत्महत्येमागील कारणांचा शोध घेतला जात आहे. स्थानिक प्रशासन आणि देवस्थान मंडळाकडूनही या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे.पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तपास पूर्ण झाल्यावरच आत्महत्येचे नेमके कारण समोर येईल,
असे पोलिसांचे म्हणणे आहे.“देवस्थानातील भ्रष्टाचार, आर्थिक घोटाळे, आणि चौकशीची भीती यामुळेच हे टोकाचे पाऊल उचलले गेले का?” घटनेच्या मागे दबाव, धमक्या की काही मोठा कटकारस्थान आहे का नितीन शेटे यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारे कोण होते? गावातील अनेक नागरिकांनी थेट आरोप करत म्हटले आहे की,
देवस्थान व्यवस्थापनामध्ये गेल्या काही वर्षांपासून अनेक आर्थिक अनियमितता व निर्णय प्रक्रियेतील अपारदर्शकता सुरू आहे. काहीचे असे म्हणणे आहे की, “नितीन शेटे यांच्याकडे अनेक गोपनीय फाईल्स व माहिती होती, जी देवस्थानातील काही बड्या व्यक्तींना उघडं पाडू शकत होती.” त्यामुळे ही आत्महत्या नव्हे तर संशयास्पद मृत्यू असल्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.